भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

पेपर फुटीने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा घात; अंधेरीत उमटली 'छात्रों की गूंज'!

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
जॉईन व्हा
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!


वृत्तांकन: संदिप कसालकर 

मुंबई: देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या 'पेपर फुटी'च्या विरोधात आता संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधीजी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या 'छात्रों की गूंज' या जनआंदोलनाने आता मुंबईतही जोर धरला आहे. उत्तर पश्चिम जिल्हा मुंबईच्या अध्यक्ष भावना जैन यांच्या नेतृत्वाखाली अंधेरी पूर्व येथील प्रमुख महाविद्यालयांमध्ये या आंदोलनाचा धडाका पाहायला मिळाला.


कोटा (राजस्थान) येथून राहुल गांधीजींनी सुरू केलेल्या या मोहिमेचा मुख्य उद्देश देशातील युवाशक्तीला संघटित करणे आणि पेपर फुटीच्या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणे हा आहे. याच धर्तीवर, अंधेरी पूर्व येथील तोलानी कॉलेज, इस्माईल युसुफ कॉलेज आणि चिनॉय कॉलेज या परिसरात उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.


आंदोलनाचे मुख्य मुद्दे:

  • पारदर्शक परीक्षांची मागणी: विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवणाऱ्या पेपर फुटीच्या प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी.
  • भविष्याची सुरक्षा: राहुल गांधीजींनी मांडल्याप्रमाणे, तरुणांना केवळ आश्वासने नको, तर सुरक्षित आणि सन्मानजनक करिअरची हमी हवी.
  • जनजागृती: विद्यार्थ्यांनी पत्रके वाटून आणि प्रत्यक्ष चर्चा करून या विषयाचे गांभीर्य सर्वांपर्यंत पोहोचवले.


'ही केवळ सुरुवात आहे' - भावना जैन

या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष भावना जैन म्हणाल्या, "राहुल गांधीजींनी उचललेला हा मुद्दा केवळ राजकीय नाही, तर हा देशाच्या भविष्याचा प्रश्न आहे. आजचा तरुण पेपर फुटीमुळे नैराश्यात आहे. त्यांना आधार देणे आणि या भ्रष्ट व्यवस्थेला जाब विचारणे हे आमचे कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग हेच दर्शवतो की, आता हा लढा थांबणार नाही."


कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, विद्यार्थी नेते आणि मोठ्या संख्येने महाविद्यालयीन तरुणांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुरू झालेला हा लढा आता अधिक तीव्र करणार असल्याचे संकेत जिल्हा काँग्रेस कमिटीने दिले आहेत. 

Bharat 24 Taas

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर