भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

न्यू हायस्कूल गदाना शाळेची MTS परीक्षेत दमदार कामगिरी; विद्यार्थ्यांचे यश, शिक्षकांचे कौतुक

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
जॉईन व्हा
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!

खुलताबाद, 11 ऑगस्ट 2026 : महाराष्ट्र टॅलेंट सर्च (MTS) परीक्षा-२०२६ मध्ये न्यू हायस्कूल, गदाना येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची छाप उमटवली आहे. या यशाबद्दल इयत्ता दहावीतील सर्व विद्यार्थी, यशस्वी विद्यार्थी तसेच शिक्षकवृंद यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.MTS परीक्षेत पुंडलिक पांडूरंग जाधव यांनी ७६ गुण मिळवत प्रमाणपत्राची कामगिरी नोंदवली आहे. तसेच वैष्णवी अडाणे (७३), सोनाक्षी गाडवे (७१) आणि दयानंद होळकर (७१) यांनीही प्रमाणपत्र मिळवून शाळेच्या यशात भर घातली आहे. प्रगती बारडे हिने तब्बल ९१ गुण मिळवत तालुका पारितोषिक पटकावले आहे.

या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग देविदास जाधव यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळेने निर्माण केलेले शैक्षणिक वातावरण यामुळे हे यश शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

“विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठे यश संपादन करू शकतात,” असे मत पांडुरंग देविदास जाधव यांनी व्यक्त केले. न्यू हायस्कूल गदाना येथील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, आगामी काळातही शाळेने अशाच प्रकारे गुणवंत विद्यार्थी घडवावेत, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

BHARAT 24 TAAS

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर