भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

कर्तव्यदक्ष तहसीलदार गुट्टेंच्या कार्याचे शेतकरी बांधवांकडून कौतुक; वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
जॉईन व्हा
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!


खुलताबाद, 10 ऑगस्ट 2026- खुलताबाद तालुक्यातील गोरगरीब, कष्टकरी व शेतकरी बांधवांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी तहसीलदारांनी केलेल्या कामाचे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग देविदास जाधव यांनी कौतुक केले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्यासाठी तहसीलदारांनी प्रशासनाच्या माध्यमातून सकारात्मक भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यांच्या प्रश्नांकडे तहसीलदारांनी गांभीर्याने लक्ष दिले. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक व शेतकरी बांधवांना भेडसावणाऱ्या वाहतुकीच्या समस्यांवर तोडगा काढण्याच्या कामाला गती मिळाली असल्याचे जाधव यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित विविध प्रश्नांवरही तहसीलदारांनी पुढाकार घेतला असून, प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या अनेक कामांना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

विशेषतः कष्टकरी शेतकरी, ग्रामीण भागातील नागरिक आणि गोरगरीब घटकांच्या समस्या सोडविण्यासाठी तहसीलदारांनी दाखविलेली तत्परता कौतुकास्पद असल्याचे जाधव यांनी म्हटले. लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन प्रशासनाच्या माध्यमातून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तहसीलदारांच्या या कर्तव्यदक्ष कार्याबद्दल शेतकरी बांधवांच्या वतीने त्यांना आशीर्वादरूपी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. खुलताबाद तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्यांच्या हिताचे आणखी अनेक प्रश्न त्यांच्या माध्यमातून मार्गी लागावेत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

“तहसीलदार साहेबांना उदंड आयुष्य लाभावे आणि त्यांच्या हातून सर्वसामान्यांची अशीच सेवा घडत राहावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना,” अशी भावना सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग देविदास जाधव यांनी व्यक्त केली. पुनश्च एकदा तहसीलदार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देत, त्यांच्या पुढील प्रशासकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

BHARAT 24 TAAS

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर