वृत्तांकन: संदिप कसालकर (संपादक, भारत २४ तास)
मराठी तरुणांनो! व्यवसाय करा – नोकरीच्या मागे धावू नका! उद्योजक सुरेश कदम यांचा प्रेरणादायी संदेश
“माझं बालपण गरिबीत गेलं… वडील गिरणी कामगार होते. पण मी ठरवलं होतं – नोकरी नाही, व्यवसाय करायचा!”
असं सांगताना निखिल लॉजिस्टिक प्रा. लि. चे मॅनेजिंग डायरेक्टर सुरेश कदम यांच्या डोळ्यात झळकत होती आत्मविश्वासाची ज्योत!
आज त्यांच्या कंपनीची पाच मोठ्या शहरांमध्ये – गुजरात, चेन्नई, कोलकाता, कोचीन आणि दिल्ली – कार्यालयं आहेत आणि वार्षिक उलाढाल 100 कोटींच्या वर!
त्यांचा एकच संदेश –
“मराठी तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता आपल्या आवडीचा व्यवसाय निवडावा, आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावं आणि स्वतःचं साम्राज्य उभं करावं!”
हा संदेश देताना ते मराठी उन्नती सामाजिक संस्था, मुंबई (मराठी उद्योग समाज मुंबई) यांच्या तृतीय वर्धापन दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
हा सोहळा शनिवार, ४ ऑक्टोबर २०२५ रोजी विलेपार्ले पूर्व येथील साठे महाविद्यालयाच्या ऑडिटोरियममध्ये उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे विशेष अतिथी होते –
दीपक परब (स्वामी समर्थ एअर फ्रेट प्रा. लि.),
जगन्नाथराव मोरे (जयेश कन्स्ट्रक्शन),
सी.ए. संतोष घाग,
संदीप तावडे (सॅचिवो फार्मा लि.),
संतोष केळकर (जनकल्याण सहकारी बँक लि.),
उद्योजिका व सामाजिक कार्यकर्त्या उल्का विश्वासराव.
या सर्व मान्यवरांचा त्यांच्या व्यावसायिक यशाबद्दल सन्मान करण्यात आला.
मान्यवरांनी तरुण उद्योजकांना यशस्वी व्यवसायाचे मर्म सांगितले, अनुभव शेअर केले.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) चे प्रकल्प अधिकारी प्रदीप सावंत यांनी शासनाच्या कर्ज योजनांची माहिती दिली, तर मुंबई बँक चे चीफ जनरल मॅनेजर संदीप सुर्वे यांनी महिलांसाठी खास कर्ज योजनांबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात अनेक यशस्वी उद्योजकांचा सन्मान झाला —
सुभाष दरेकर, भारती कदम, प्रज्ञा तांबे, सुमन परब, गीता गावडे, अनिल बागवे, आशिष सुर्वे, प्रभंजन तावडे, अभिषेक डिचोलकर, राकेश जाधव, अमोल शिंदे, संपतराव सूर्यवंशी, मनीषा मराठे — यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
संस्थेचे सचिव विनायक सुर्वे यांनी प्रास्ताविक केले, कार्याध्यक्ष सहदेव सावंत आणि अध्यक्ष सुहास तावडे यांनी उद्योजकांना प्रोत्साहित केले.
उपाध्यक्ष अनिल कदम यांनी आभार मानले, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकास राणे, शैलेश माने, सूर्यकांत बावकर, आशा परब, संदीप शेलार, राजेश शेलार, सुरेंद्र तावडे, दिलीप चव्हाण, महेश सावंत यांनी परिश्रम घेतले.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली —
पण प्रत्येक उपस्थिताच्या मनात एकच विचार घोळत होता...
“आपणही काहीतरी मोठं करायचं!”
0 Comments