Hot Posts

6/recent/ticker-posts

जोगेश्वरीचा रात्रीचा देवदूत: भटक्या जीवांचा तारणहार सुजित सुर्वे!

जोगेश्वरीच्या हरी नगरात ‘रात्रीचा देवदूत’!
भूक लागली तर माणूस अन्न शोधतो…
पण भटके जीव कुणाकडे हात जोडणार?
शहर झोपतं… रस्ते शांत होतात…
आणि त्या वेळी प्राणी मित्र सुजित सुर्वे मात्र दिवसरात्र चालणाऱ्या त्यांच्या मिशनवर निघतात 
भुकेल्या भटक्या कुत्र्यांना आणि मांजरींना अन्न देण्यासाठी!
अंगणात, गल्लीत, इमारतीच्या कोपऱ्यात…
जिथे हाक ऐकू येते तिथे सुजित दादा पोहोचतात.
नाही कॅमेरे… नाही प्रसिद्धी…
फक्त माणुसकीची जबाबदारी आणि
निराधार जीवांसाठी खऱ्या अर्थाने 'सेवा' 
त्यांच्या एका हाकेला दहा-दहा पिलं धावत येतात…
डोळ्यात कृतज्ञतेचा प्रकाश…
आणि शेपट्यांच्या हालचालीत प्रेमाचा सागर!

सुजित सुर्वे यांचे शब्द:
“जीव कोणताही असो… पोट त्यालाही असतंच. देवाने आवाज दिला, तर देण्याची जबाबदारी आपल्या मनाची.”

Post a Comment

0 Comments