भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

ज्येष्ठ नागरिक हाच समाजाचा खरा सन्मान! जोगेश्वरीत माणुसकीचा झरा सरसावला

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
जॉईन व्हा
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!

वृत्तांकन: संदिप कसालकर
जोगेश्वरी: माणुसकीची नाती जपतानाच समाजऋण फेडण्याच्या उदात्त हेतूने जोगेश्वरीत एक आगळावेगळा 'ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा' पार पडला. रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई आणि इनर व्हील क्लब ऑफ मुंबई, पार्लेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी मेघवाडी सभागृहात हा सोहळा संपन्न झाला. यावेळी ७० ज्येष्ठ नागरिकांना ब्लॅंकेट आणि वॉटर बॅग देऊन सन्मानित करण्यात आले, ज्यामुळे थंडीच्या दिवसात ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमलले.

सन्मान आणि माणुसकीची साथ

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या संजीवनी सुधाकर सावंत यांचा झालेला विशेष सत्कार. इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा भारती बिदारी यांच्या हस्ते सावंत यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी निवृत्त प्राचार्य पूनम पधारकामे आणि डान्स अकॅडमीच्या अर्पिता साठे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

कर्तव्याची जाणीव आणि कृतज्ञता

संस्थेच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष सुबोध बने आणि कार्याध्यक्ष सहदेव सावंत यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सहदेव सावंत यांनी इनर व्हील क्लबच्या कार्याचा गौरव करतानाच, "ऑक्टोबर २०२५ मध्ये बाल विकास विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांना शूज वाटप करून या संस्थेने आपल्या कार्याची पावती दिली आहे," अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली.

दानाचे हात सरसावले!

संस्थेचे कार्य पाहून भारावलेल्या जगदीश सावंत आणि नम्रता भोसले यांनी तातडीने प्रत्येकी ५००० रुपयांची देणगी रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई या संस्थेला जाहीर केली. समाजाप्रती असलेल्या या बांधिलकीचे सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

दिग्गजांची उपस्थिती

या सोहळ्याचे नेटके सूत्रसंचालन चिटणीस यशवंत साटम यांनी केले, तर कार्यकारी सदस्या इंद्रायणी सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला कार्याध्यक्ष गणपत तावडे, अशोक परब, चिटणीस सुरक्षा घोसाळकर, सह-खजिनदार विजय खामकर, सदस्य सुहास बने आणि आरजेएमडीएस इंग्लिश स्कूलचे सीईओ दीपक खानविलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Bharat 24 Taas

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर