भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

पर्यावरणाचा संदेश देणारी बाप्पांची 'बाल-नगरी'! | जोगेश्वरीच्या आरजेएमडीएस स्कूलमध्ये शाडूच्या मातीपासून बाप्पा साकारताना चिमुकले कलाकार

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
जॉईन व्हा
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!

विशेष रिपोर्ट: संदिप कसालकर

"बुद्धीची देवता, कलांचा अधिपती... आणि आपल्या सगळ्यांचा लाडका बाप्पा! पण विचार करा, जेव्हा हाच बाप्पा आपल्या छोट्या छोट्या बालमित्रांच्या हातांतून, शाडूच्या मातीतून साकारतो, तेव्हा तो आनंद किती पट वाढतो?

जोगेश्वरीच्या 'आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल'मध्ये विद्यार्थ्यांनी एकत्र येत, पर्यावरण संवर्धनाचा एक अनोखा आणि तितकाच पवित्र संदेश दिला आहे.

आरजेएमडीएस इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी 'शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती निर्मिती आणि रंगकाम कार्यशाळा' आयोजित करण्यात आली थी. केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, त्यांच्या कल्पनाशक्तीला आणि सर्जनशीलतेला वाव देणं हा यामागचा मुख्य उद्देश होता.

शाळेच्या मुख्याध्यापिका डिंपल दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि शिक्षिका निकिता भागवत व कोमल गुजर यांच्या प्रयत्नांमुळे ही कार्यशाळा यशस्वी झाली. विद्यार्थ्यांनी केवळ मूर्ती बनवल्या नाहीत, तर मातीला आकार देण्यापासून ते अगदी बारीक-सारीक नक्षीकाम आणि मनमोहक रंगकामापर्यंतचा प्रत्येक क्षण स्वतः अनुभवला आहे!

या चिमुरड्यांचा उत्साह वाढवण्यासाठी खास अतिथी देखील उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज संस्थेचे उपकार्याध्यक्ष अशोक परब, प्रशासकीय समितीचे अधिकारी यशवंत साटम, मुख्याध्यापिका शबनम हूल्लूर, सुपरवायझर आर्या भास्कर आणि आरजेएमडीएस चे सीईओ दीपक खानविलकर यांनी या मूर्तींची पाहणी केली.

विद्यार्थ्यांच्या हातातील ती जादू पाहून मान्यवरांनीही त्यांचे तोंडभरून कौतुक केले. 'स्वतःच्या हाताने गणराया साकारताना विद्यार्थ्यांनी कलेसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संस्कारही आत्मसात केलाय,' असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

शाळेच्या या अभिनव आणि इको-फ्रेंडली उपक्रमाचे आज संपूर्ण जोगेश्वरीत, पालकांकडून आणि शिक्षणप्रेमींकडून प्रचंड कौतुक होत आहे."

Kasalkar Insights

Sandeep Kasalkar's career is characterized by a relentless pursuit of journalistic excellence and a deep commitment to diverse storytelling. Whether through ground reporting, editorial leadership, or advocacy, he continues to make significant contributions to the media landscape. His multifaceted expertise and leadership are instrumental in shaping and advancing the field of journalism in India.

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर