Hot Posts

6/recent/ticker-posts

जोगेश्वरीतील ओबेरॉय टॉवर… अकराव्या मजल्यावरून मध्यरात्रीची रहस्यमय उडी!

जोगेश्वरी पूर्वेत बुधवारी मध्यरात्री एक थरारक आणि हादरवून टाकणारी घटना घडली. ओबेराय स्प्लेंडर या टॉवरच्या अकराव्या मजल्यावरून एका 31 वर्षीय महिलेने खाली उडी मारल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्या महिलेला तातडीने ट्रॉमा केअर रुग्णालयात हलवण्यात आले.

डॉक्टरांनी मात्र दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी, रात्री 00.10 वाजता त्यांना दाखलपूर्व मृत घोषित केले.

ही घटना नेमकी अपघात होती, आत्महत्या होती, की काहीतरी वेगळं…? यावर अद्याप पर्दा उघडलेला नाही. परिसरातल्या सीसीटीव्ही फुटेजपासून ते त्या महिलेच्या शेवटच्या काही तासांचा मागोवा—मेघवाडी पोलीस प्रत्येक शक्यता तपासत आहेत.

मेघवाडी पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, कोणताही निष्कर्ष काढण्यास ते सावध भूमिका घेत आहेत. इमारतीत चौकशी सुरू असून, रहिवाशांकडूनही माहिती गोळा केली जात आहे.

ही घटना घडली तेव्हाची शांत मध्यरात्र… अचानक उठलेला एक मोठा आवाज… आणि त्यानंतर वेगाने पसरलेले दहशतीचं वातावरण—या सर्वांनी संपूर्ण सोसायटी हादरून गेली आहे.

या घटनेने पुन्हा एकदा महानगरातील मानसिक आरोग्य, तणाव आणि एकटेपणाचे प्रश्न समोर आणले आहेत.

Post a Comment

0 Comments