वृत्तांकन: संदिप कसालकर
दिल्लीमध्ये केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची सदिच्छा भेट घेऊन मुंबई-कोकण किनारपट्टीवरील जेट्टींच्या आधुनिकीकरणासाठी तसेच पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय बंदर’ हे नाव देण्याची ठोस मागणी खासदार रविंद्र वायकर यांनी केली आहे.
ही मागणी केवळ नावापुरती नसून, कोकणातील समुद्रमार्गाचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर निर्माण करून स्थानिक रोजगार व पर्यटन वाढवण्यासाठी एक मोठा टप्पा ठरू शकतो.
या बैठकीत वर्सोवा जेट्टीच्या प्रलंबित सौंदर्यीकरण व आधुनिकीकरण, कोळी समाजाच्या गरजा, तसेच मच्छीमार बांधवांसाठी आवश्यक सुविधा या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. यावर केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी लवकरच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
ही हालचाल म्हणजे मुंबई आणि कोकणच्या किनारपट्टीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देऊन या प्रकल्पास ऐतिहासिक सन्मान मिळणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेस चालना देणारी ही योजना ठरणार आहे.
0 Comments