शिर्डी (१३ जुलै) – साईबाबांच्या पावन नगरीत एका आगळ्या-वेगळ्या सामाजिक स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, हा कार्यक्रम समाजातील विविध घटकांना आत्मभान देणारा ठरणार आहे. रविवार, दिनांक १३ जुलै रोजी सकाळी ११.३० ते दुपारी २.०० या वेळेत हॉटेल जे. के. पॅलेस, राहता-मनमाड रोड येथे हा स्नेहमेळावा संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमात हरवत चाललेल्या सामाजिक आत्मभानावर चर्चा, सामाजिक प्रश्नांवरील संवाद व एकमेकांची ओळख अशा विषयांवर संवाद साधण्यात येणार आहे.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मा. भाऊसाहेब वाकचौरे (खासदार, शिर्डी), मा. उमाकांत मिटकरी (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पोलीस प्राधिकरण), मा. सुजय विखे पाटील (माजी खासदार), मा. सुधीर तांबे (माजी विधान परिषद सदस्य), मा. संचित यादव (चित्रपट आघाडी, महाराष्ट्र राज्य), मा. ऊषाताई तनपुरे (माजी नगराध्यक्ष, राहुरी) यांचे मोलाचे मार्गदर्शन होणार आहे.
मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय भीमसेन चव्हाण व अभिनेत्री अनुपमा पाटील हे त्यांच्या सह-कलाकारांसह विशेष उपस्थिती नोंदवणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून संतोष पाटील, राजेंद्र दजी, देवेंद्र देशमुख, नानासाहेब शिंदे पाटील आणि राहुल मुळे या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला असून, महाराष्ट्रातील विविध भागांतील समाजसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
0 Comments