मुंबई-नवी मुंबईला जोडणाऱ्या महत्त्वाच्या अटल सेतूवर पुन्हा एकदा दुर्दैवी घटना घडली आहे. जे.जे. रुग्णालयातील एका 32 वर्षीय डॉक्टरने सोमवारी रात्री या सेतूवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉक्टर ओंकार कवितके यांचा या घटनेत सहभाग असल्याची पुष्टी झाली असून, त्यांच्या शोधासाठी ध्रुवतारा बोटीद्वारे खाडीत शोधमोहीम सुरू आहे.
अटल सेतू बनतोय 'सुसाईड पॉइंट'?
अटल सेतूच्या उद्घाटनानंतर काही महिन्यांतच येथे आत्महत्यांचे प्रकार वाढले असून, हा सेतू आत्महत्येसाठी 'हॉटस्पॉट' ठरत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. ही घटना या मालिकेतील आणखी एक गंभीर उदाहरण ठरली आहे.
घटनेचा तपशील
सोमवारी रात्री एक प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने अटल सेतूवरून एका तरुणाला खाडीत उडी मारताना पाहिलं आणि तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना एक होंडा अमेझ कार आणि आयफोन सापडला. तपासात या कारचे आणि मोबाईलचे मालक डॉ. ओंकार भागवत कवितके असल्याचे निष्पन्न झाले. ते कळंबोलीचे रहिवासी असून जे.जे. रुग्णालयात डॉक्टर पदावर कार्यरत होते.
आईला शेवटचा फोन: “जेवायला येतो”
पोलिस तपासात एक हृदयद्रावक माहिती समोर आली. रात्री 9:11 वाजता डॉ. कवितके यांनी त्यांच्या आईला फोन करून सांगितलं की, "मी लवकरच जेवणासाठी घरी येतो." हा संवाद त्यांचा शेवटचा ठरला. त्यानंतर काही मिनिटांतच त्यांनी अटल सेतूवरून उडी घेतली.
पोलिस तपास सुरू
उलवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अर्जुन राजणे यांनी सांगितले की, “सध्या आम्ही मोबाईल कॉल डिटेल्स, CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक माहिती तपासत आहोत. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.”
0 Comments