Hot Posts

6/recent/ticker-posts

दुरावलेल्या मराठी शिक्षणाला दिला नवा श्वास – नूतन विद्या मंदिरचा थक्क करणारा यशप्रवास!

विशेष प्रतिनिधी:
"सतत झपाटलेली गुणवत्ता...!
समर्पित शिक्षणाचा वारसा...
आणि विद्यार्थ्यांना घडवणारी एक प्रेरणादायी शाळा –
ही आहे नूतन विद्या मंदिर, मानखुर्द!"
महाराष्ट्र मंडळ (भा.अ.केंद्र) शिक्षण संस्थेच्या या नामांकित शाळेत सध्या सुमारे 2000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे, ही शाळा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचं भक्कम व्यासपीठ ठरली आहे.

जिथे इतर मराठी शाळांमधील विद्यार्थीसंख्या दिवसेंदिवस घटतेय, तिथे नूतन विद्या मंदिर आपल्या वेगळेपणामुळे आणि गुणवत्तेच्या जोरावर विद्यार्थीसंख्या टिकवून आपलं अस्तित्व ठामपणे सिद्ध करत आहे.
11 जुलै रोजी, बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटना यांच्यावतीने, चित्रपट अभिनेते आणि निर्माते मा. शरद पोंक्षे तसेच सिनेअभिनेत्री श्रीम. चिन्मयी सुमीत यांच्या हस्ते या शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री. शैलेंद्र कदम यांचा विशेष गौरव करण्यात आला!

बृहन्मुंबईतील शेकडो शाळांपैकी फक्त काहीच शाळांना हा सन्मान लाभला… कारण मागील वर्षी, शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात, माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला!

हा यशस्वी प्रवास शक्य झाला — संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देसाई, कार्यवाह श्री. राजेंद्र हटवार, आणि मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि सर्व नूतन परिवाराच्या अखंड प्रयत्नांमुळे.

शाळेच्या या शैक्षणिक यशाचं, सुसंस्कारांचं आणि समर्पणाचं हे एक प्रेरणादायी उदाहरण आहे…
नूतन विद्या मंदिर – जिथे शिक्षण म्हणजे केवळ गुणांपुरतं मर्यादित नसून, जीवनमूल्यांचं शिक्षणही घडतं!

Post a Comment

0 Comments