Hot Posts

6/recent/ticker-posts

रुग्णालयातील अनागोंदी संपणार! वायकरांच्या बैठकीनंतर मोठ्या घोषणा!

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालय आणि कूपर रुग्णालयातील अनागोंदी व गैर कार्यपद्धतीवर खासदार रविंद्र वायकर यांनी धडाकेबाज कारवाईची रूपरेषा ठरवली आहे.


विशेष बैठक:

खासदार वायकरांनी अतिरिक्त मनपा आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत रुग्णालय प्रशासनासह घेतलेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले:

  • कुपर रुग्णालयात डिसेंबर-जानेवारी २०२६ मध्ये CSRच्या माध्यमातून केमोथेरेपी सुविधा सुरू!
  • ट्रॉमा रुग्णालयात दोन शिफ्टमध्ये डायलिसिसची सुविधा.
  • ट्रॉमा रुग्णालयात केईएम रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण बांगर यांची नियुक्ती.

खासदार वायकर यांनी सांगितले:

“रुग्णालयातील कंत्राटी भरतीतील घोटाळ्याची चौकशी होईल. ऑपरेशनचे टार्गेट ठरवून लवकरात लवकर रुग्णांना सेवा देण्यात यावी. रुग्णालयातील कामकाज पारदर्शक व सुस्थितीत पार पडावे.”

 रुग्णालय प्रशासनाने यावेळी स्पष्ट केले की:

  • एनआयसीयू आणि आयसीयू रुग्णशय्यांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
  • केमोथेरेपी सुविधा लवकरच सुरू होणार आहे.
  • औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून दिला जाईल.
  • रुग्णालय परिसरात स्वच्छता आणि उंदीरविरोधी उपाययोजना ठोस केली जात आहेत.

रुग्णालयातील कर्मचारी व डॉक्टर यांच्यातील संवाद सुधारण्यासाठी प्रशिक्षण सुरू आहे. येत्या दिवसांत सुरक्षा रक्षकांनाही संभाषण कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाईल.

“रुग्णसेवा अधिक सुरळीत करण्यासाठी, समाजातील प्रत्येक घटकाने महानगरपालिकेच्या प्रयत्नांना पाठबळ द्यावे,” असे अतिरिक्त मनपा आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आवाहन केले.

Post a Comment

0 Comments