Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमान्य गणेश तलाव परिसरातील खड्ड्यांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप

वृत्तांकन: संदिप कसालकर 

जोगेश्वरी : लोकमान्य गणेश विसर्जन तलाव, शाम नगर येथे निर्माण झालेल्या मोठ्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आता प्रतिक्रिया रंगू लागल्या आहेत. दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत विसर्जन पार पडतं, पण यंदा भक्तीच्या मार्गावरच पोटहोल्स आणि खड्ड्यांनी भाविकांची चिंता वाढवली आहे. मूर्ती घेऊन जाणाऱ्या भक्तांना पाय घसरल्यामुळे अपघाताची भीती सतावत आहे.

या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अनंत नर यांनी आरोप केला की, परिसरात अवैध बांधकाम सुरू असून जर ते थांबले नाही तर आंदोलन केले जाईल.

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे अनिल म्हसकर यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की,
"हे काम भक्तांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी वायकर साहेब करत आहेत. ऊन, पाऊस, वारा यापासून संरक्षण देण्यासाठी कायमस्वरूपी शेडची सुविधा येथे निर्माण केली जात आहे. यात कोणताही राजकीय हेतू नाही."

त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, "गेल्या अनेक वर्षांपासून भक्तांना त्रास होईल असं काम झालं नाही आणि होणारही नाही. विरोधकांकडून जाणूनबुजून गैरसमज पसरवले जात आहेत. जनता नव्या सुविधांचे स्वागत करेल."

Post a Comment

0 Comments