भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

खुलताबादच्या ७४० व्या उरूसाच्या पार्श्वभूमीवर उरूस व्यवस्थापन समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
जॉईन व्हा
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!


खुलताबाद,३० जुन २०२६ : हजरत ख्वाजा शेख मुन्तजबुद्दीन ज़र ज़री ज़र बख्श दूल्हा (रह.) यांच्या ७४० व्या वार्षिक उरूसाच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय, खुलताबाद येथे उरूस व्यवस्थापन समिती व दर्गाह समितीची महत्त्वपूर्ण बैठक तहसीलदार संतोष गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उरूसादरम्यान भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि सर्व व्यवस्था पारदर्शकपणे राबविण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

बैठकीत उरूसासाठी आवश्यक असलेल्या प्रकाश व्यवस्था, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण, आरोग्य सेवा तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याशिवाय मागील वर्षीच्या उर्स निविदेबाबत जिल्हाधिकारी व वक्फ बोर्डाच्या बैठकीत मंजूर झालेल्या ठरावांचा आढावाही घेण्यात आला.

यंदाच्या उरूसासाठी निविदा प्रक्रिया मागील महिन्यापासून सुरू असल्याची माहिती देण्यात आली. मात्र निविदा अंतिम करण्यापूर्वी दुकानदार व पाळणे व्यावसायिकांची संयुक्त बैठक घेऊन त्यांना विश्वासात घेण्यात यावे, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवावी आणि कोणताही वाद निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

तसेच उरूसादरम्यान भाविक, व्यापारी व स्थानिक नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व संबंधित शासकीय विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश देण्यात आले. तहसीलदार संतोष गुट्टे, मुख्याधिकारी शेख समीर तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व कामकाज पारदर्शकपणे पूर्ण करून भाविकांना उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीस दर्गाह समितीचे अध्यक्ष एजाज अहमद, ॲड. कैसरुद्दीन, मतीन जागीरदार, मुबशिरोद्दीन,नगरसेवक मुनीबुद्दीन,सालेह मोहम्मद, अभियंता अफनान अहमद, नगराध्यक्ष सय्यद आमीर पटेल, जितेंद्र बोचरे, अंकुश भराड तसेच दर्गाह समिती, उर्स व्यवस्थापन समिती आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी व सदस्य उपस्थित होते.बैठकीच्या शेवटी दर्गाह समितीचे अध्यक्ष एजाज अहमद यांनी उपस्थितांचे आभार मानले. सर्व विभागांच्या समन्वयातून यंदाचा ७४० वा उर्स शांततापूर्ण, सुव्यवस्थित आणि यशस्वीपणे पार पाडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

BHARAT 24 TAAS

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर