भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

खुलताबादमध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा उत्साहात शुभारंभ; माजी नगराध्यक्ष ॲड. एस. एम. कमर यांच्या हस्ते बालकांना पाजले पोलिओचे दोन थेंब

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
जॉईन व्हा
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!


खुलताबाद, २८ जुन २०२६ : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत खुलताबाद शहरातील जुना बसस्थानक परिसरात रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. शहरातील पाच वर्षांखालील बालकांना पोलिओची प्रतिबंधक लस देत आरोग्य विभागाने लसीकरण मोहिमेला प्रारंभ केला.

या मोहिमेचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक ॲड. एस. एम. कमर यांच्या हस्ते बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून करण्यात आला. यावेळी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पालकांना पोलिओ लसीकरणाचे महत्त्व पटवून देत पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास माजी नगरसेवक सय्यद मकसूद अली कादरी, शेख हमीदोद्दीन, अशरफ खान, मुश्ताक अहमद, हाजी सिद्दीक अहमद, शेख रियाज, हबीब अहमद टेलर, सय्यद जाफर, अधिपरिचारिका रोहिणी पोहनेकर, लॅब टेक्निशियन क्षितिज वाघमारे, कक्ष सेवक मोरे तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

पोलिओसारख्या गंभीर आजारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आणि आपल्या पाच वर्षांखालील सर्व बालकांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक ॲड. एस. एम. कमर यांनी यावेळी केले.

BHARAT 24 TAAS

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर