भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

खा. संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग जाधव यांचा जाहीर निषेध

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
जॉईन व्हा
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!


खुलताबाद, २७ जुन २०२६ : पत्रकारांना धमकावणे म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला असून अशा कृत्याला कोणतीही माफी नसावी, अशी भूमिका खुलताबाद तालुक्यातील ममनापुर येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग जाधव यांनी व्यक्त केली. खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविरोधात केलेल्या कथित धमकीच्या वक्तव्याचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. पांडुरंग जाधव म्हणाले की, पत्रकार हे तळागाळातील जनतेच्या न्याय व हक्कासाठी सातत्याने संघर्ष करत असतात. शेतकऱ्यांचे प्रश्न असोत, रस्ते, वीज, डीपी, लोबकळणाऱ्या तारा किंवा इतर सार्वजनिक समस्या असोत, पत्रकार स्वतःचा जीव धोक्यात घालून सत्य जनतेसमोर आणण्याचे काम करतात. अन्यायाविरुद्ध आवाज उठवून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे.

"पत्रकारांविषयी बोलायचे झाले तर शब्द अपुरे पडतील. पत्रकार हे देवासमान आहेत. माझेही अनेक सार्वजनिक प्रश्न पत्रकारांच्या माध्यमातून मार्गी लागले आहेत. त्यामुळे पत्रकारांना धमकावणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे," असे जाधव यांनी ठामपणे सांगितले.पत्रकारांवर दबाव टाकण्याचा किंवा धमकावण्याचा कोणताही प्रयत्न लोकशाहीसाठी घातक असून दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

BHARAT 24 TAAS

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर