भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

पळसवाडी येथे आषाढी एकादशी निमित्त जिल्हा परिषद शाळा व नाथ माध्यमिक विद्यालयाची भव्य दिंडी; गावात भक्तिमय वातावरण!

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!
जॉईन व्हा

खुलताबाद 25 जुलै 2026 - आषाढी एकादशीचे औचित्य साधून पळसवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्री नाथ माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने गावात भव्य बालदिंडी सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "विठ्ठल रुक्मिणी" च्या गजराने संपूर्ण पळसवाडी गाव दुमदुमून गेले होते.

 या दिंडी सोहळ्यात शालेय विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा पारंपरिक पोशाख परिधान केला होता. टाळ-मृदुंगाच्या गजर, तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या विद्यार्थिनी आणि हातात भगव्या पताका घेतलेले बालवारकरी हे सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. या धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमामुळे गावात सर्वत्र आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रसंगी पंचायत समिती सदस्या सौ. योगिता बरडे, उपसरपंच सोमिनाथ ठेंगडे, तसेच सुधाकरभाऊ दहीवाळ, नारायण बरडे व अभिषेक ठेंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुतार सर व सर्व शिक्षक वर्ग, तसेच नाथ माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक ठेंगडे सर, खोसे सर, चांदणे सर, आणि काळे सर यांनी विशेष परिश्रम घेतले.

या भक्तिमय सोहळ्याला ग्रामस्थ संतोष औटे, तय्यब शेख, शिवम ठोंबरे, सागर औटे यांच्यासह गावातील नागरिक, महिला व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावकऱ्यांनी जागोजागी दिंडीचे स्वागत करून बालवारकऱ्यांचे कौतुक केले.

BHARAT 24 TAAS

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर