मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
⛽ पेट्रोल मुंबई: ₹104.21/L | पुणे: ₹103.85/L
🪙 सोने (24K) ₹72,450 / 10gm
🥈 चांदी ₹84,200 / 1kg
📅 पंचांग आजची तिथी: श्रावण शु. पक्ष
ब्रेकिंग

ए.एफ.के.जी इंग्लिश हायस्कूलची आषाढी एकादशी निमित्त भव्य नगर दिंडी; विठ्ठल नामाच्या गजरात खुलताबाद झाला भक्तिमय

अक्षर आकार:


खुलताबाद, 25 जुलै 2026 - आषाढी एकादशीचे औचित्य साधून अपॉस्टोलिक फेथ किड्स गार्डन इंग्लिश हायस्कुल यांच्या वतीने शनिवारी (ता.२५)भव्य नगर दिंडीचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या प्रांगणातून सकाळी दिंडीला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल"च्या अखंड नामगजराने संपूर्ण परिसर भक्तिमय केला. दिंडीत विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ-मृदंगाच्या गजरात अभंग, भजन व हरिनाम संकीर्तन सादर केले. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज तसेच विठ्ठल-रुक्मिणी यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दिंडी मार्गावर नागरिकांनी फुलांची उधळण करत दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत केले.

यावेळी भद्रा मारुतीच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर विद्यार्थ्यांनी सादर केलेले 'भक्त पुंडलिक' हे नाट्य सादरीकरण, भावपूर्ण आरती तसेच भक्तिरसाने ओतप्रोत नृत्याविष्कार यांनी उपस्थितांची मने जिंकली. या सदरीकरणांमुळे संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाले असून, प्रत्यक्ष विठ्ठल-रुक्मिणीच अवतरल्याचा दिव्य अनुभव उपस्थितांना आला. या भक्तिमय कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद देत कलाकार विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.

या प्रसंगी विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व तसेच भक्ती, सेवा, समर्पण आणि संस्कार या मूल्यांची माहिती देण्यात आली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि सामाजिक मूल्यांविषयीची जाणीव अधिक दृढ होते, असे प्रतिपादन शाळेचे संस्थापक अध्यक्ष अजय चिमणे यांनी केले.

यावेळी भद्रा मारुतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर विद्यार्थ्यांनी सादर केलेले 'भक्त पुंडलिक' हे नाट्य सादरीकरण, भावपूर्ण आरती तसेच भक्तिरसाने ओतप्रोत नृत्याविष्कार यांनी उपस्थितांची मने जिंकली. भद्रा मारुती देवस्थानचे अध्यक्ष मिठू पाटील बारगळ व नगरसेवक परसराम बारगळ यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची आरती करण्यात आली. या कार्यक्रमात इयत्ता ७ वीचा विद्यार्थी हर्षवर्धन पवार याने भगवान विठ्ठलाची भूमिका, तर आरोही चौधरी हिने रुक्मिणीची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली. त्यांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाले असून, प्रत्यक्ष विठ्ठल-रुक्मिणीच अवतरल्याचा दिव्य अनुभव उपस्थितांना आला. उपस्थितांनी कलाकार विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त दाद देत भरभरून कौतुक केले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री चिमणे तसेच शिक्षिका माधुरी घोडके, ज्योती केरे, उज्वला केरे, संगीता नागे, निकिता बारगळ, हर्षदा ठेंगडे यांच्यासह शिक्षकवृंद, पालक आणि स्थानिक नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले. भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या या नगर दिंडीमुळे खुलताबाद शहर विठ्ठलमय झाले असून उपस्थितांनी शाळेच्या या संस्कारक्षम उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

BHARAT 24 TAAS

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)