खुलताबाद, 29 जुलै 2026 : निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आली आहे. सन 2002 च्या मतदार यादीमध्ये फेरोज खान अजीज खान यांचे प्रत्यक्ष वय 51 वर्षे असताना, यादीत तब्बल 259 वर्षे असे नमूद करण्यात आल्याने प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मतदार यादीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या शासकीय दस्तऐवजात एवढी मोठी चूक कशी झाली, याबाबत नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अशा प्रकारच्या त्रुटींमुळे मतदार नोंदणी प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर परिणाम होत असून, संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करून संबंधित त्रुटी तातडीने दुरुस्त करावी तसेच अशा निष्काळजीपणासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मतदार यादीतील अशा चुका भविष्यात टाळण्यासाठी आयोगाने अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.


Comments