भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

जगप्रसिद्ध वेरूळचे 'नाव मोठे नि लक्षण खोटे'; सोलापूर-धुळे महामार्गावरील सर्व्हिस रोड बनला 'तलाव'!

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
जॉईन व्हा
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!


खुलताबाद, २६ जुन २०२६ : जागतिक वारसा लाभलेल्या आणि देश-विदेशातील हजारो पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसराला सध्या प्रशासकीय उदासीनतेचा फटका बसत आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वेरूळ येथील सर्व्हिस रोडची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, हा रस्ता आहे की पावसामुळे तयार झालेला तलाव, असा संतप्त सवाल नागरिक आणि पर्यटकांकडून उपस्थित केला जात आहे.

या सर्व्हिस रोडवर मोठमोठे खड्डे पडले असून, पावसाचे पाणी साचल्याने ते पूर्णपणे झाकले जात आहेत. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. दुचाकीस्वार, चारचाकी चालक तसेच पायी जाणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

वेरूळ लेणी पाहण्यासाठी दररोज देश-विदेशातून हजारो पर्यटक येथे येतात. मात्र, मुख्य महामार्गावरून खाली उतरताच त्यांना या जीवघेण्या आणि खड्डेमय सर्व्हिस रोडचा सामना करावा लागत आहे. जागतिक पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या वेरूळची ही अवस्था पाहून पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, यामुळे महाराष्ट्राची तसेच देशाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार दुरुस्तीची मागणी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित प्रशासनाने तात्काळ सर्व्हिस रोडची दुरुस्ती करून पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्याची मागणी जोर धरत आहे.

• प्रतिक्रिया : 

"जगप्रसिद्ध वेरूळ लेणी पाहण्यासाठी दररोज देश-विदेशातून हजारो पर्यटक मोठ्या अपेक्षेने येथे येतात. मात्र, सोलापूर-धुळे महामार्गावरील सर्व्हिस रोडची दुरवस्था पाहून महाराष्ट्राची काय प्रतिमा निर्माण होत असेल? रस्त्यावर पडलेले भलेमोठे खड्डे आणि त्यात साचलेले पाणी म्हणजे प्रशासनाने पर्यटकांच्या स्वागतासाठी तयार केलेला तलावच आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासनाने केवळ टोल वसुली न करता जनतेच्या सुरक्षेलाही प्राधान्य द्यावे." 

– अभिषेक ठेंगडे, स्थानिक नागरिक, वेरूळ परिसर

BHARAT 24 TAAS

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर