विशेष प्रतिनिधी
कल्याण : अश्लील व्हिडिओद्वारे धमकी आणि पाच लाखांची जबर वसुली – या सगळ्या गंभीर आरोपांत अडकलेल्या अंबादास भालेराव याचा अटकपूर्व जामीन अर्ज कल्याण सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
प्रकरणाचा थरार:
- गुन्हा क्र. I-331/2025, तिळकनगर पोलीस ठाण्यात दाखल
- ऑक्टोबर 2018 ते मार्च 2025 दरम्यान फिर्यादीसोबत शरीरसंबंध
- अश्लील व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी
- ₹5 लाखांची जबर वसुली व पुढील पैशासाठी मारहाण – असा फिर्यादीचा दावा
आरोपीकडून काय सांगितलं?
आरोपी अंबादास भालेरावच्या वकिलांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला की, फिर्यादी व आरोपी यांच्यात परस्पर संमतीने प्रेमसंबंध होते. व्हॉट्सअॅप चॅट्स, प्रेमाच्या कबुल्या, व रु.2,22,000/- चा नॉटरी करार याचा दाखला देत ब्लॅकमेलिंगचा आरोप फेटाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
तपास यंत्रणांचा ठाम विरोध:
- आरोपीवर यापूर्वीही 3 गंभीर गुन्हे दाखल
- फिर्यादीस फोनवरून धमक्या – NC नं. 1024/2025, 1145/2025 दाखल
- आरोपीच्या भावाकडूनही जीवे मारण्याची धमकी
- व्हॉट्सअॅप चॅटमध्ये आरोपीकडून पैशाची मागणी व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी स्पष्ट
न्यायालयाचा स्पष्ट निर्णय:
"प्रकरण गंभीर आहे. आरोपांच्या मुळाशी जाण्यासाठी व्हिडिओचा स्त्रोत तपासणे आवश्यक आहे. पुरावे नष्ट होण्याचा धोका आहे," असे म्हणत अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एफ. सय्यद यांनी अंबादास भालेराव याचा अटकपूर्व जामीन अर्ज दिनांक 23 जून 2025 रोजी फेटाळला.
0 Comments