विशेष प्रतिनिधी
बालविकास विद्या मंदिर, जोगेश्वरी (मराठी प्राथमिक विभाग) येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच सुखद आश्चर्य! अपोलो कंपनी आणि सेवा सहयोग फाऊंडेशन यांच्या सहकार्याने येथे विद्यार्थ्यांना मोफत स्कूल किट (दप्तर आणि शालेय साहित्य) वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे अनेक पालकांचा आर्थिक भार हलका झाला असून, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले. त्यानंतर ‘एक पेड माँ का’ अभियानांतर्गत पाहुण्यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या – प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अलका मांडके – यांचे स्वागत रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबईचे कार्याध्यक्ष व RJMDS चे चेअरमन सहदेव सावंत यांनी पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन केले. त्यांनी आपल्या भाषणात पालक आणि शिक्षकांच्या सहकार्यामुळेच शाळेची गुणवत्ता सातत्याने उंचावत असल्याचे नमूद केले.
डाॅ. मांडके यांनी विद्यार्थ्यांच्या उमद्या स्वप्नांचे कौतुक करत, शिक्षणाची खरी ताकद आणि शिक्षक-पालकांची जबाबदारी यावर प्रभावी मार्गदर्शन केले.
0 Comments