Hot Posts

6/recent/ticker-posts

१० वर्षांपासून फरार होता... पण शेवटी कायद्याच्या हातात सापडलाच! मेघवाडी पोलिसांची थरारक कारवाई


वृत्तांकन: संदिप कसालकर (संपादक, भारत २४ तास)

नेरुळच्या गजबजलेल्या रेल्वे स्टेशनजवळ मेघवाडी पोलिसांची थरारक कारवाई

एक तप – तब्बल १० वर्षांचा सर्च ऑपरेशन. आरोपीचा पत्ता नव्हता, हालचाल नव्हती, आणि पोलिसांना वाटलं होतं की तो कायमचा अदृश्य झाला असेल. पण कायद्याचे हात लांब असतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं!

मेघवाडी पोलीस ठाण्यात 01 ऑगस्ट 2016 रोजी दाखल झालेल्या गु.र.क्र. 249/16 मध्ये आरोपी जाफर मोहंमद गणी शेख (३७ वर्षे) हा 498(अ) – पत्नीवरील छळ, 406 – विश्वासघात, 323 – मारहाण, 504 व 506 – शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी, तसेच 34 – सहआरोपींचा सहभाग अशा गंभीर गुन्ह्यांतून फरार झाला होता. पीडित महिला अशमीन जाफर सादिक गणीने दाखल केलेल्या तक्रारीत जाफरवर विवाहानंतर शारीरिक आणि मानसिक त्रास देत सर्वसामान्य माणसाच्या सहनशक्तीच्या पलीकडचा छळ केल्याचा आरोप आहे.

या आरोपीचा शोध वर्षानुवर्षे सुरूच होता. अनेक वेळा तपास थांबायच्या टोकावर आला, पण सपोनि सम्राट वाघ आणि त्यांच्या टीमने हार मानली नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि मैदानात घालवलेले दोन दिवस यांचा वापर करत जाफरच्या ठिकाणाचा शोध घेतला.

आणि अखेर... नेरुळ रेल्वे स्टेशनजवळ एका सामान्य सकाळी, पोलिसांनी जाफरला घेरलं. तो धावण्याचा प्रयत्न करत होता. ओळख पटली. काही क्षणांचे धक्कादायक वातावरण... आणि १० वर्षांच्या फरार आरोपीला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं!

आज जाफर मोहंमद गणी शेख मेघवाडी पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. पोलिसांनी केवळ आरोपीला अटक केली नाही, तर १० वर्षे प्रलंबित असलेल्या एका महिलेच्या न्यायाच्या आशेचा दिवा पुन्हा उजळवला आहे.

तपास पथक:

  • सपोनि सम्राट वाघ
  • पो.ह. माने (क्रमांक 03798)
  • पो.शि. बागुल (क्रमांक 110910)
  • पो.शि. ठाकूर (क्रमांक 141293)

ही केवळ अटक नव्हे... हे एका दशकाच्या संयम, चिकाटी आणि सत्याच्या शोधात लावलेल्या पोलिसी व्रताचे फळ आहे!

Post a Comment

0 Comments