Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्राला शंभर तुकाराम मुंढेंची गरज; कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची बदली नको" – सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग जाधव



 खुलताबाद जि. छ. संभाजीनगर (10 जुन 2026)

कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले Tukaram Mundhe यांनी अन्न व औषध प्रशासन विभागात भेसळ, अवैध गुटखा निर्मिती आणि जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या गैरप्रकारांविरोधात कठोर कारवाई सुरू केल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा अधिकाऱ्यांना पूर्ण पाठबळ देण्याची गरज असल्याचे मत खुलताबाद तालुक्यातील ममनापुर येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग देविदास जाधव यांनी व्यक्त केले.

जाधव म्हणाले की, "एक तुकाराम मुंढे संपूर्ण यंत्रणा कामाला लावू शकतात. महाराष्ट्राने त्यांच्या कामाची दखल घेतली असून, राज्याला अशा शंभर तुकाराम मुंढेंसारख्या प्रामाणिक आणि धाडसी अधिकाऱ्यांची गरज आहे."

त्यांच्या मते, दुधातील भेसळ, अवैध गुटखा निर्मिती तसेच अन्न व औषधांशी संबंधित बेकायदेशीर धंद्यांविरोधात कठोर कारवाई करून तुकाराम मुंढे यांनी जनतेच्या आरोग्याचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक विभागातील आयुक्त, जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचा आदर्श घेतला तर शासन व्यवस्था अधिक पारदर्शक आणि सामान्य नागरिकांना न्याय देणारी बनेल, असेही त्यांनी सांगितले.जाधव यांनी भ्रष्टाचारावरही टीका करताना, "भ्रष्टाचार ही वरून खाली येणारी प्रवृत्ती आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केल्यास संपूर्ण यंत्रणेत सकारात्मक बदल घडू शकतो," असे मत व्यक्त केले.

अन्न व औषध प्रशासनातील संभाव्य बदलीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारला आवाहन केले की, कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली करू नये, तर त्यांना जनहितासाठी निर्भयपणे काम करण्याची संधी द्यावी. अन्यायाविरोधातील त्यांचा लढा सुरू राहणे हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.

Post a Comment

0 Comments