भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

पळसवाडीचा आदर्श: लोकवर्गणी, स्वखर्च आणि एकजुटीतून साकारला शेतरस्ता!

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
जॉईन व्हा
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!


खुलताबाद, जि. छ संभाजीनगर (14 जुन 2026)

शासन आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना किती हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात, याचं जळजळीत उदाहरण पळसवाडी येथे पाहायला मिळत आहे. शेतात जाण्यासाठी चांगला रस्ता मिळावा म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक आमदार आणि खासदारांकडे वारंवार मागणी करून थकलेल्या येथील शेतकऱ्यांनी अखेर एक महत्त्वपूर्ण आणि धाडसी पाऊल उचललं आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या निधीची किंवा मदतीची अपेक्षा न ठेवता, शेतकऱ्यांनी एकत्र येत स्वखर्चाने शेतात जाण्यायोग्य कच्चा रस्ता तयार केला आहे.

पळसवाडी येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आणि पिकवलेला शेतीमाल बाजारात आणण्यासाठी पूर्वी अत्यंत बिकट मार्गाचा अवलंब करावा लागत होता. पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था चिखलमय होऊन वाहतूक पूर्णपणे ठप्प होत असे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून "पक्का रस्ता करून द्या", अशी विनंती शेतकऱ्यांनी अनेकदा स्थानिक आमदार आणि खासदारांकडे केली होती. परंतु, प्रत्येक वेळी केवळ आश्वासनांशिवाय शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडले नाही. अखेर लोकप्रतिनिधींच्या या ढिसाळ कारभाराला कंटाळून शेतकऱ्यांनी स्वतःच हे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला. कुठल्याही सरकारी निधीची वाट न पाहता गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन निधी गोळा केला. स्वतः श्रमदान आणि आर्थिक वाटा उचलून त्यांनी शेतात जाण्यासाठी योग्य असा कच्चा रस्ता तयार केला आहे. यामुळे तात्पुरता का होईना, पण शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा मार्ग मोकळा झाला असून शेतीमाल वाहून नेणे सोपे झाले आहे. शेतकऱ्यांच्या या स्वावलंबी पावलाचे परिसरात कौतुक होत असले, तरी प्रशासकीय व्यवस्थेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

• 'एकदा तरी या रस्त्याकडे लक्ष द्या!' – शेतकऱ्यांची उद्विग्न साद

पक्क्या रस्त्याची गरज: कच्चा रस्ता तात्पुरती सोय आहे, पण भविष्यात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी येथे डांबरीकरण किंवा सिमेंटचा पक्का रस्ता होणे गरजेचे आहे.आश्वासनांची पूर्तता करा: "आम्ही आमचे कर्तव्य चोख बजावले आहे, आता तरी आमदार आणि खासदारांनी या रस्त्याकडे लक्ष देऊन तो पक्का करून द्यावा," अशी रास्त अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पळसवाडीतील शेतकऱ्यांनी दाखवलेली ही एकजूट इतर गावासांठी आदर्श ठरत असली, तरी "निवडणुकीपुरते मते मागणाऱ्या लोकप्रतिनिधींना आता तरी जाग येणार का?" असा जळजळीत प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.




BHARAT 24 TAAS

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर