भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

खुलताबाद शहराच्या विकासासंदर्भात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याशी शेख अदीब यांची सदिच्छा भेट

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
जॉईन व्हा
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!

खुलताबाद, जि. छ.संभाजीनगर (14 जुन 2026)

राष्ट्रवादी युवक काँग्रेस, खुलताबाद शहराध्यक्ष आदिब अब्दुल अजीज यांनी पालकमंत्री Sanjay Shirsat, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांची शनिवारी (ता 13) सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान खुलताबाद शहराच्या सर्वांगीण विकासासह नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, युवकांसाठी रोजगार व कौशल्य विकासाच्या संधी, तसेच विविध विकासकामांना गती देण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्याबाबत सकारात्मक विचारविनिमय झाला.

यावेळी शेख आदिब अब्दुल अजीज यांनी खुलताबाद शहराच्या प्रगतीसाठी शासनाचे अधिकाधिक सहकार्य मिळावे, तसेच जनहिताच्या विविध मागण्यांकडे प्राधान्याने लक्ष देण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. पालकमंत्री संजय शिरसाट यांनीही शहराच्या विकासासाठी आवश्यक बाबींचा सकारात्मक विचार करून प्रशासनाच्या माध्यमातून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.शेख अदिब अब्दुल अजीज यांनी यापुढेही खुलताबाद शहरातील नागरिकांच्या समस्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडून त्यांचे निराकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे नमूद केले. या सदिच्छा भेटीत शहराच्या विकासासाठी परस्पर सहकार्याची भूमिका अधोरेखित करण्यात आली.

BHARAT 24 TAAS

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर