भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

चिंचोली शिवारात २१ वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या; परिसरात हळहळ

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
जॉईन व्हा
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!


खुलताबाद, जि. छ.संभाजीनगर,दि. १२ (प्रतिनिधी):

खुलताबाद तालुक्यातील चिंचोली शिवारातील गट क्रमांक ८७ मधील शेतात २१ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेमुळे चिंचोली गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मृत युवकाचे नाव मनोज गोकुळ डेडवाळ (वय २१, रा. चिंचोली) असे आहे. घटनेची माहिती मिळताच खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश झलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी राहुल दांडगे, आनंद आरसुडे आणि आप्पासाहेब इंगळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आवश्यक कायदेशीर कार्यवाही पूर्ण केली.

तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मनोज यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.मनोज डेडवाळ यांच्या पश्चात आई-वडील आणि एक बहिण असा परिवार आहे. घरातील एकुलत्या एक मुलाच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून चिंचोली गावासह परिसरात शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे.


मृत मनोज डेडवाळ


BHARAT 24 TAAS

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर