Hot Posts

6/recent/ticker-posts

सुलीभंजन शिवारातील जामुन तलावात बुडून २७ वर्षीय युवकाचा मृत्यू


खुलताबाद,जि. छ. संभाजीनगर प्रतिनिधी (दि. १४):

खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन शिवारातील जामुन तलावात बुडाल्याने २७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. १४) सायंकाळी घडली. या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

मृत युवकाचे नाव मनोज भाऊसाहेब साठे (वय २७, रा. वडगाव कोल्हाटी, वाळूज, छत्रपती संभाजीनगर) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (ता 14) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तो सुलीभंजन शिवारातील जामुन तलावात बुडाला. त्याला तातडीने वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतना सूर्यवंशी यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार खुलताबाद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के.के गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून मृत्यूचे नेमके कारण व इतर बाबींचा तपास केला जात आहे.

Post a Comment

0 Comments