Hot Posts

6/recent/ticker-posts

गल्लेबोरगाव ग्रामपंचायतीवर भाजपच्या 'तिसऱ्या आघाडी'चा झेंडा फडकविण्याचा निर्धार


 खुलताबाद जि. छ.संभाजीनगर (15 जुन 2026)

तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम व प्रगत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गल्लेबोरगाव ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी वार्डनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सरपंचपद मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी राखीव घोषित करण्यात आले आहे. आरक्षण सोडतीनंतर गावातील राजकीय घडामोडींना वेग आला असून भारतीय जनता पक्षाने यावेळी ग्रामपंचायत निवडणूक सर्व ताकदीनिशी लढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

जाहीर झालेल्या आरक्षणानुसार वार्ड क्रमांक १ मध्ये एक जागा सर्वसाधारण महिला, तर दोन जागा सर्वसाधारण पुरुषांसाठी राखीव आहेत. वार्ड क्रमांक २ मध्ये अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण महिला प्रत्येकी एक जागा राखीव आहे. वार्ड क्रमांक ३ मध्ये ओबीसी महिला व सर्वसाधारण महिला यांच्यासाठी प्रत्येकी एक जागा राखीव करण्यात आली आहे. वार्ड क्रमांक ४ मध्ये ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष अशा तीन जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. तर वार्ड क्रमांक ५ मध्ये सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण पुरुष आणि ओबीसी महिला यांच्यासाठी प्रत्येकी एक जागा राखीव ठेवण्यात आली आहे.

आरक्षण सोडतीनंतर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या 'तिसऱ्या आघाडी'च्या माध्यमातून जोरदार लढत देण्याचा निर्धार करण्यात आला. राज्यातील व स्थानिक पातळीवरील भाजप नेतृत्वाच्या बळावर गल्लेबोरगावचा सर्वांगीण विकास साधता येईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.


आमदार प्रशांत बंब, जिल्हा परिषद सदस्य कुणाल दांडगे आणि पंचायत समिती सदस्या योगिता बरडे हे भाजपच्या नेतृत्वाखाली कार्यरत असल्याने गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी व विकासकामे मिळू शकतील, असे मत उपस्थितांनी मांडले. कोणत्याही परिस्थितीत यावेळी गल्लेबोरगाव ग्रामपंचायतीवर भाजपच्या तिसऱ्या आघाडीचा झेंडा फडकवायचा, असा निर्धार कार्यकर्त्यांनी या वेळी व्यक्त केला.यावेळी भाजपचे सरचिटणीस अरूण पाटे, उपाध्यक्ष राजेंद्र बढे, युवा नेते मुकेश परदेशी, सचिन भोजने, अनिल देव्हारे, संदीप डोंगरे, धनंजय भागवत, नवनाथ लवंगे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...



Post a Comment

0 Comments