Hot Posts

6/recent/ticker-posts

निवासी जिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांची खुलताबादच्या शिष्टमंडळाकडून सदिच्छा भेट; उर्स नियोजन व विकासकामांवर चर्चा

 


खुलताबाद, जि.छ.संभाजीनगर (15 जुन 2026)

 निवासी जिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांची खुलताबादच्या शिष्टमंडळाने सोमवारी (15) रोजी सदिच्छा भेट घेत त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी खुलताबाद येथील प्रसिद्ध सूफी संत हजरत ख्वाजा शेख मुन्तजबोद्दीन जर जरी जर बक्ष (रह.) यांच्या वार्षिक उर्साच्या पार्श्वभूमीवर आवश्यक नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

दरगाह हजरत ख्वाजा शेख मुन्तजबोद्दीन जरजरी जर बक्ष दूल्हा रह. (खुलताबाद)


शिष्टमंडळाने उर्सादरम्यान होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांसाठी पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था तसेच इतर प्रशासकीय बाबींच्या नियोजनासाठी जिल्हास्तरीय आढावा बैठक लवकरात लवकर आयोजित करण्याची मागणी केली. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत असल्याने प्रशासनाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंती करण्यात आली.


यावेळी खुलताबाद शहर व परिसरातील विविध विकासकामांसाठी जिल्हा नियोजन व विकास समिती (डीपीडीसी) तसेच इतर विभागांमार्फत निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली. भविष्यात खुलताबादच्या विकासाशी संबंधित विविध प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्या विकास अजेंडामध्ये समाविष्ट करण्यात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

जनार्दन विधाते यांनी यापूर्वी उपजिल्हाधिकारी असताना खुलताबादची आठवण करून देत शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद दिला. उर्साच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात येईल तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून हा उत्सव सुरळीत व यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी आश्वासन दिले. या शिष्टमंडळात दरगाह कमिटी हद्दे कला अध्यक्ष एजाज अहमद, सचिव मतीन जहांगीरदार, दरगाह कमिटी हद्दे खुर्द अध्यक्ष शरफोद्दीन मोहम्मद रमजानी, माजी नगराध्यक्ष तथा दरगाह कमिटी सदस्य अॅड. कैसरोद्दीन तसेच नगरसेवक व दरगाह कमिटी सदस्य मुनीबोद्दीन आदींचा समावेश होता.

Post a Comment

0 Comments