भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

खुलताबाद नगरपरिषदेच्या सार्वजनिक जागेवर मोबाईल टॉवर उभारण्यास विरोध; परवानगी रद्द करण्याची मागणी

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
जॉईन व्हा
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!


 खुलताबाद, जि छ.संभाजीनगर (15 जुन 2026)

खुलताबाद नगर परिषदेच्या सार्वजनिक मालकीच्या जागेवर प्रस्तावित मोबाईल टॉवर उभारणीच्या प्रक्रियेला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला असून, संबंधित कंपनीला देण्यात आलेली अथवा प्रस्तावित परवानगी तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी शेख जफर शेख बशीर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्याधिकारी, नगर परिषद खुलताबाद यांना सविस्तर निवेदन सादर केले असून जिल्हाधिकारी तसेच राज्याच्या नगरविकास विभागालाही त्याची प्रत पाठविण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ज्या जागेवर मोबाईल टॉवर उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे ती नगर परिषदेची सार्वजनिक मालमत्ता आहे. अशा जागेचा खुली निविदा प्रक्रिया, सार्वजनिक सूचना आणि आवश्यक प्रशासकीय मंजुरीशिवाय कोणत्याही खासगी कंपनीस वापरासाठी देणे नियमबाह्य असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्रस्तावित मोबाईल टॉवरमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर, पर्यावरणावर आणि सार्वजनिक सुरक्षिततेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. तसेच संबंधित जागेबाबत यापूर्वीही अतिक्रमण व कथित अनियमिततेच्या तक्रारी समोर आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित कंपनीला देण्यात आलेली अथवा प्रस्तावित परवानगी तातडीने रद्द करावी, तसेच त्या जागेवरील कोणत्याही प्रकारचे बांधकाम किंवा करार प्रक्रिया त्वरित स्थगित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सार्वजनिक जागेचा वापर स्थानिक बेरोजगार युवक आणि नागरिकांना लघुउद्योग, छोटी दुकाने किंवा स्वयंरोजगारासाठी पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून, नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित जबाबदार अधिकारी व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शेख जफर शेख बशीर यांनी इशारा दिला आहे की, त्यांच्या मागण्यांवर योग्य ती कार्यवाही न झाल्यास न्याय मिळविण्यासाठी ते उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावतील.

BHARAT 24 TAAS

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर