भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

आईच्या स्मृतीत वृक्षारोपण; झाडाच्या रूपाने जपली मायेची कायमस्वरूपी आठवण

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
जॉईन व्हा
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!



छत्रपती संभाजीनगर, १४ जुलै २०२६ : आईच्या पवित्र स्मृतींना अनोखी मानवंदना देत माटेगाव (ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील शेळके परिवाराने वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश दिला. आईच्या नावाने लावलेले हे झाड म्हणजे तिच्या प्रेम, संस्कार आणि मायेच्या आठवणी कायम जिवंत ठेवण्याचा भावनिक प्रयत्न असल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.

गोरख रखमाजी शेळके यांच्या पुढाकारातून झालेल्या या उपक्रमात संपूर्ण शेळके परिवार सहभागी झाला. "आईचे ऋण कधीही फेडता येत नाही, मात्र तिच्या स्मृती जपण्यासाठी झाड लावणे हीच खरी आदरांजली," अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या परिवारात कारभारी रखमाजी शेळके, ज्ञानेश्वर कारभारी शेळके, सिद्धेश्वर कारभारी शेळके, लक्ष्मीबाई पवार, शिक्षक दत्तात्रेय रखमाजी शेळके, पोलीस कर्मचारी मच्छिंद्र रखमाजी शेळके तसेच नातू जगदीश सिद्धेश्वर शेळके यांचा समावेश असून सर्वांनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारली.

वृक्षारोपण हा केवळ एक कार्यक्रम नसून पुढील पिढ्यांसाठी स्वच्छ, हिरवेगार आणि निरोगी पर्यावरण निर्माण करण्याचा संकल्प असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. आईच्या आठवणींना जपतानाच समाजालाही पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे.

सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संरक्षणाचा सुंदर संगम घडवणाऱ्या शेळके परिवाराच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत असून, प्रत्येकाने आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मरणार्थ किमान एक झाड लावावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.

BHARAT 24 TAAS

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर