भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

डिजिटल गृहगणनेत खुलताबादची बाजी; १००.७४% काम पूर्ण

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!
जॉईन व्हा

अॅपच्या मदतीने विक्रमी गृहगणना; खुलताबादची जिल्ह्यात बाजी, लक्ष्यापेक्षा अधिक घरांची नोंद



खुलताबाद (जि. छ.संभाजीनगर) 11 जुन 2026

देशातील आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सुरू असलेल्या गृहगणना (घरयादी) मोहिमेला वेग आला असून, डिजिटल पद्धतीने सुरू असलेल्या या मोहिमेत खुलताबाद तालुक्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. लक्ष्यापेक्षाही अधिक घरांची नोंदणी करून तालुक्याने १००.७४ टक्के काम पूर्ण केल्याने प्रशासनाकडून या कामगिरीचे कौतुक होत आहे.

जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या मार्गदर्शनाखाली गृहगणनेचे काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. ९ जूनअखेर जिल्ह्यातील निश्चित ९ लाख २१ हजार ६८० घरांपैकी ८ लाख ८७ हजार ९३२ घरांची नोंदणी पूर्ण झाली असून, एकूण प्रगती ९६.३४ टक्क्यांवर पोहोचली आहे.

यंदाची गृहगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने ‘एचएलओ’ (HLO) मोबाईल अॅपच्या माध्यमातून केली जात आहे. या कामासाठी जिल्ह्यात ५,४११ प्रगणक आणि पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

खुलताबादचा ‘सेंच्युरी स्ट्राइक

खुलताबाद तालुक्यासाठी ४०,५६२ घरांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ४०,८६३ घरांची नोंद करण्यात आली असून, त्यामुळे कामगिरी १००.७४ टक्क्यांवर पोहोचली आहे. लक्ष्यापेक्षा अधिक घरांची गणना झाल्याने खुलताबाद तालुक्याने जिल्ह्यात अव्वल स्थान मिळवले आहे. तसेच छावणी परिषदेनेही १००.६१ टक्के काम पूर्ण केले आहे.


तालुकानिहाय प्रगती

• खुलताबाद – 100.74%

• वैजापूर – 98.91%

• कन्नड – 97.63%

• फुलंब्री – 97.44%

•  सोयगाव – 96.08%

• पैठण – 94.57%

• सिल्लोड – 94.56%


• गंगापूर – 94.24%


अधिकाऱ्यांचे कौतुक

या उल्लेखनीय कामगिरीसाठी चार्ज अधिकारी तथा मुख्याधिकारी शेख समीर, कार्यालयीन अधीक्षक रुस्तुम फुलारे, तांत्रिक सहाय्यक इमरान शेख, मनीषा लघाने, जितेंद्र बोचरे तसेच सर्व पर्यवेक्षक आणि प्रगणक यांच्या कार्याचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे.

BHARAT 24 TAAS

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर