भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

खुलताबादमध्ये वेल्डिंग दुकानात चोरी; लाखो रुपयांच्या साहित्यावर चोरट्यांचा डल्ला

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!
जॉईन व्हा

खुलताबादमध्ये वेल्डिंग दुकानात चोरी; लाखो रुपयांच्या साहित्यावर चोरट्यांचा डल्ला


खुलताबाद जि. छ.संभाजीनगर ( दि. 11 जुन 2026)

खुलताबाद येथील शंजरी हॉटेल जवळील महाराष्ट्र वेल्डिंग वर्क्स या दुकानात गुरुवारी (दि. 11 जून) पहाटे सुमारे 2.10 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून महागडे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दुकान मालक अबरार अहेमद कुरैशी (रा.कसाबखेडा ता. खुलताबाद) यांनी खुलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, चोरट्यांनी खुलताबाद वेरुळ टी पॉइंट वरील वेल्डिंगच्या दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा कापून दरवाजा तोडत आत प्रवेश केला. त्यानंतर ड्रिल मशीन, ग्राइंडर, वेल्डिंग मशीन, सुमारे 60 फूट कॉपर वायर, टूल बॉक्स, कलर मशीन तसेच वाहन उचलण्यासाठी वापरण्यात येणारा जॅक (जोग) आदी साहित्य चोरी करून नेले.

दुकानामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्यामध्ये संशयितांचे चित्रण झाल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. तसेच हाफीज खलील चौक ते शंजरी हॉटेल या मार्गावरील शासकीय सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्येही संबंधित व्यक्तींचे फुटेज उपलब्ध असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या कॅमेऱ्यांची तपासणी करून आरोपींचा शोध घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही त्यांच्या दुकानात चोरीची घटना घडली होती; मात्र त्या प्रकरणात अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींना अटक करावी व त्यांच्याविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदाराने पोलीस प्रशासनाकडे केली आहे. 


BHARAT 24 TAAS

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर