भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

जिल्हाधिकाऱ्यांची पिंपरी गावाला भेट; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची विचारपूस, जनगणना कार्याची पडताळणी

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!
जॉईन व्हा


 कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर (10 जुन 2026)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी बुधवारी (दि. १०) कन्नड तालुक्यातील पिंपरी गावाला भेट देत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत आहे का, याची माहिती घेतली. तसेच आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर संबंधित कुटुंबाला बियाण्यांची थैलीही प्रदान केली.पिंपरी येथील दिवंगत शेतकरी विष्णू काशिनाथ जोगदंड यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधताना जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या सद्यस्थितीची माहिती जाणून घेतली. शासनाच्या विविध योजनांमधून मिळालेल्या सुविधांचा आढावा घेत आवश्यक त्या मदतीबाबत अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या.



याच दौऱ्यात जिल्हाधिकारी गौडा यांनी गावातील सुरू असलेल्या जनगणना कार्याची प्रत्यक्ष पडताळणी केली. बाबुलाल भाऊलाल कुदळे यांच्या कुटुंबाची जनगणना नोंद मोबाईल अॅपद्वारे तपासून त्यांनी माहितीची खात्री केली आणि जनगणना प्रक्रियेच्या अचूकतेचा आढावा घेतला.या भेटीदरम्यान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू पी. एम., अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकूणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार संतोष गुट्टे, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



BHARAT 24 TAAS

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर