गुरुग्राम | भारत 24 तास | वृत्तांकन: संदिप कसालकर (संपादक)
शहरी प्रशासनातील खऱ्या सेवाभावाचा आवाज आता राष्ट्रीय व्यासपीठावर घुमतोय!
हरियाणातील ICAT सेंटर 2, IMT मानेसर येथे दि. 3 व 4 जुलै 2025 रोजी पार पडलेल्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्षांच्या राष्ट्रीय परिषदेत, एक महत्त्वपूर्ण आवाज सर्वांचे लक्ष वेधून गेला — तो म्हणजे मुंबई उत्तर मध्यचे खासदार रविंद्र वायकर यांचा.
परिषदेचा उद्देश : शहरी स्वराज्य संस्थांना बळकट करण्यासाठी आचारसंहिता आणि प्रक्रिया स्पष्ट करणे
का आवश्यक आहे शहरी स्थानिक संस्थांवर लक्ष केंद्रीत करणे?
या संस्था नागरिकांच्या सर्वात जवळच्या सेवा पुरवतात
पाणी, स्वच्छता, आरोग्य यांसारख्या अत्यावश्यक गरजांची पूर्तता
तळागाळातील लोकशाही विकासाचे मूळ केंद्र
समोरील अडथळे – एकसंधता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची कमतरता
-
बैठकींच्या प्रक्रियांमध्ये एकरूपता नाही
-
निर्णयांची योग्य नोंद नाही, अंमलबजावणी शिथिल
-
परिषदांमध्ये व्यत्यय आणि वेळेचा अपव्यय
उपाय सुचवले – धोरण, प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान
-
संरचित व वेळेत बैठकांचा कार्यक्रम
-
अजेंडाचे स्पष्ट नियोजन, प्रश्नोत्तर, शून्यकाल यांना वेळ
-
बैठकींचे थेट डिजीटल प्रक्षेपण
-
नगरसेवकांना प्रशिक्षण आणि सर्वोत्कृष्ट कार्यपद्धतींचे आदानप्रदान
खासदार रविंद्र वायकर यांची ठाम भूमिका:
"तुम्ही पिता नाही, तुम्ही सेवक आहात! नगरपिता ही संज्ञा कालबाह्य आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत आता ‘नगरसेवक’ हीच संज्ञा असावी."
"आपले पंतप्रधानसुद्धा म्हणतात – ‘मी पीएम सेवक आहे’, मग आपण का नाही? आपण सर्व लोकप्रतिनिधीही जनतेचे खरे सेवक आहोत. आम्ही थेट लोकांमध्ये असतो, त्यांच्या अडचणी समजतो आणि मार्ग काढतो."
खासदार रविंद्र वायकर यांचे हे स्पष्ट भाषण सभागृहात जोरदार टाळ्यांचा गजर घेऊन गाजले. त्यांची ही भूमिका अनेकांनी खुलेपणाने स्वीकारली.
0 Comments