खुलताबाद, 18 ऑगस्ट 2026 - तालुक्यातील गदाणा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मंगळवार, दि. १८ ऑगस्ट रोजी शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शाळेच्या शैक्षणिक विकासाला चालना देणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पालकांचा सहभाग वाढविणे आणि शाळेच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याच्या उद्देशाने ही निवड प्रक्रिया घेण्यात आली.
या निवड प्रक्रियेत कमलनयन अण्णा वाघ यांची अध्यक्षपदी, तर सौ. अर्चना अशोक अधाने यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. नवीन पदाधिकाऱ्यांवर शाळेच्या विकासासह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी काम करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी राजू सांडू बिरसाने, आजिनाथ रामराव तुपे, जनार्दन स्वामीनाथ चव्हाण, ज्ञानेश्वर महाराज कुकलारे, किरण दगडू गायकवाड, ज्ञानेश्वर श्रीराम जगताप आणि जितेंद्र रतन जाधव यांची निवड करण्यात आली. शिक्षणप्रेमी प्रतिनिधी म्हणून बाबासाहेब रुस्तुम खाडे यांची निवड झाली.
महिला सदस्य म्हणून सौ. रेखा जितेंद्र जाधव, सौ. पूजा नंदकुमार खाडे, सौ. आरती भगवान दिशवरे, सौ. सविता दत्तू चव्हाण आणि सौ. सरला पोपट चव्हाण यांचा समितीत समावेश करण्यात आला. त्यामुळे पालक, महिला आणि ग्रामस्थांच्या सहभागातून शाळेच्या विविध प्रश्नांवर काम करण्यास समितीला बळ मिळणार आहे.
शाळेच्या प्रशासनिक कामकाजात मुख्याध्यापक तथा समिती सचिव म्हणून श्रीमती हिवराळे सी. आर. आणि शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्रीमती वाघ व्ही. एस. यांची जबाबदारी राहणार आहे. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून इयत्ता सहावीतील प्रज्ञा पंकज वाहूळ व दुर्गेश दादाराव चव्हाण यांची निवड करण्यात आली.
नवीन समितीच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, शाळेच्या मूलभूत सुविधा, स्वच्छता, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक व ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्याचेही समितीचे उद्दिष्ट आहे.
समितीच्या गठनप्रसंगी शिक्षिका लतिका बोर्डे, परविन सय्यद, आस्मा शेख, शारदा गायकवाड, जयश्री गवळे, रेणुका पिसे तसेच शिक्षक पंढरी तायडे, फिरोज पठाण, साईनाथ चव्हाण आणि अमोल जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी माजी अध्यक्ष संजय दिगंबर चव्हाण, सरपंच पती रामहरी तुपे, सदस्य काकासाहेब अधाने, जनार्दन वाहूळ, उपसरपंच पती दत्तू चव्हाण यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी वैजनाथ अधाने, गणेश चव्हाण, कचरू वाघ, पांडुरंग वाघ, लक्ष्मण चव्हाण, संतोष अधाने, साहेबराव चव्हाण, भागुबाई वाघ, पत्रकार अशोक अधाने आणि सामाजिक कार्यकर्ते अरुण अधाने यांचीही उपस्थिती होती. नव्या शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळेच्या विकासकामांना गती मिळून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, चांगल्या सुविधा आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केली.



Comments