मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
⛽ पेट्रोल मुंबई: ₹104.21/L | पुणे: ₹103.85/L
🪙 सोने (24K) ₹72,450 / 10gm
🥈 चांदी ₹84,200 / 1kg
📅 पंचांग आजची तिथी: श्रावण शु. पक्ष
ब्रेकिंग

“मंगेश साबळेंना तडीपार करणार, पण जनतेच्या मनातून कोण?”; पांडुरंग जाधव यांचा सवाल

अक्षर आकार:


छत्रपती संभाजीनगर, 19 ऑगस्ट 2026 - गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांना तडीपार करण्याची कारवाई सुरू असताना, “जनतेच्या मनातून मंगेश साबळेंना कोण तडीपार करणार?” असा सवाल सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग देविदास जाधव यांनी उपस्थित केला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणाऱ्या व्यक्तीवरच कारवाई का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत अन्याय आणि भ्रष्टाचाराविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न योग्य नसल्याचे म्हटले.

“कायदा हा जनतेच्या संरक्षणासाठी आहे. मग अन्याय, भ्रष्टाचार आणि गैरप्रकारांविरोधात आवाज उठवणाऱ्यांवरच कारवाई का?” असा सवाल जाधव यांनी केला. गंभीर गुन्हे करणारे मोकाट फिरत असताना जनतेचा आवाज बनून प्रश्न मांडणाऱ्या मंगेश साबळे यांना तडीपारीची नोटीस देणे ही व्यवस्थेने आत्मपरीक्षण करण्याची वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकशाहीमध्ये नागरिकांना प्रश्न विचारण्याचा आणि अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार आहे. “तडीपारची नोटीस ही केवळ मंगेश साबळे यांच्यावरील कारवाई नाही, तर जनतेच्या आवाजासमोर उभा राहिलेला प्रश्न आहे,” असे जाधव यांनी म्हटले. एका मंगेश साबळेंचा आवाज दाबला तरी हजारो मंगेश साबळे तयार होतील, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

मंगेश साबळे यांच्या लढ्याला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगत पांडुरंग जाधव यांनी सत्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. “सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नहीं. सत्य बोलणाऱ्यांना तडीपार नको, न्याय हवा,” असा स्पष्ट संदेश त्यांनी प्रशासनाला दिला.

BHARAT 24 TAAS

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)