भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

खा. संजय दिना पाटील यांचा खुलताबादेत निषेध; शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबत गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची केली मागणी

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
जॉईन व्हा
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!

खुलताबाद,२६ जुन २०२६ : खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना अत्यंत आक्षेपार्ह, अश्लील व धमकीपूर्ण भाषा वापरल्याने खुलताबाद येथे तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवारी खुलताबाद पोलीस ठाण्यात या खासदाराविरोधात कडक कारवाई करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. 

यावेळी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना  दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खा. संजय दिना पाटील यांच्याशी संबंधित घटनेत पत्रकारांना शिवीगाळ करण्यात आली असून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे.

पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजाप्रती उत्तरदायी भूमिका पार पाडत असतात. जनतेपर्यंत सत्य माहिती पोहोचविण्याचे कार्य करणाऱ्या पत्रकारांना अशा प्रकारे धमकावणे, शिवीगाळ करणे व त्यांच्या जीवितास धोका निर्माण करणारी भाषा वापरणे हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे कृत्य आहे. यामुळे पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदार पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारचे वर्तन होणे हे निषेधार्ह असून कायद्यापुढे सर्व समान आहेत. त्यामुळे संबंधित घटनेची सखोल चौकशी करून उपलब्ध व्हिडिओ, ऑडिओ व इतर पुराव्यांच्या आधारे खासदार संजय दिना पाटील यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील लागू असलेल्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा व कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी.

तसेच पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात व अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी योग्य प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील घोडके, विजय चौधरी, देवदत्त कोठारे, अमोल काळे, श्रीकांत कुलकर्णी, किशोर पुसे, शेख जमीर, दिलीप मिसाळ, मच्छिंद्र घोरपडे, विजय आव्हाड, हुसेन पटेल, संदीप औताडे, दिनेश सावजी, किरण महेर, राजेंद्र सोनवणे आदीसह पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी पत्रकारांच्या भावना शासनापर्यंत पोहचविण्यात येईल असे सांगितले.

BHARAT 24 TAAS

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर