भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून जिल्हा बँकेच्या संचालकपदापर्यंत; संदीप निकम-पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
जॉईन व्हा
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!

खुलताबाद, २३ जुन २०२६ :- राजकारणात सातत्य, निष्ठा आणि संयम या गुणांच्या जोरावर सामान्य कार्यकर्त्यालाही मोठी संधी मिळू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे खुलताबाद तालुक्यातील इंदापूर गावचे सरपंच संदीप निकम-पाटील. पक्षनिष्ठा जपत अनेक वर्षे संघटनात्मक पातळीवर काम करणाऱ्या या तरुण कार्यकर्त्याची छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली असून, त्यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

इंदापूर गावातील सामान्य कुटुंबातून पुढे आलेले संदीप निकम-पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय कार्य केले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये उमेदवारीची अपेक्षा असतानाही पक्षाने त्यांना संधी दिली नव्हती. मात्र, त्यातून नाराजी न व्यक्त करता त्यांनी पक्षाशी असलेली निष्ठा कायम ठेवली आणि संघटनेच्या कामात स्वतःला झोकून दिले.राजकीय क्षेत्रात अनेकदा पदे आणि संधी तात्काळ मिळत नाहीत; मात्र प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची दखल योग्य वेळी घेतली जाते, याची प्रचिती संदीप निकम-पाटील यांच्या निवडीमुळे आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत त्यांनी संचालकपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि अनुकूल राजकीय समीकरणांमुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.

आमदार प्रशांत बंब यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेल्या संदीप निकम-पाटील यांना मिळालेली ही संधी केवळ वैयक्तिक यश नसून, पक्षातील तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. त्यांच्या निवडीमुळे खुलताबाद तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्थेच्या संचालकपदी एका सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवड झाल्याने इंदापूर गावासह संपूर्ण तालुक्यात आनंद व्यक्त केला जात आहे. सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

"निष्ठा, संयम आणि सातत्यपूर्ण कार्य यांचे फळ एक ना एक दिवस नक्की मिळते," हे संदीप निकम-पाटील यांच्या निवडीने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

BHARAT 24 TAAS

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर