भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

गल्लेबोरगाव ग्रामपंचायत वार्ड रचनेवर पँथर्स रिपब्लिकन पक्षाचा आक्षेप; वार्ड क्रमांक ५ एसटी प्रवर्गासाठी राखीव करण्याची मागणी

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
जॉईन व्हा
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!

 


खुलताबाद - तालुक्यातील गल्ले बोरगाव ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या वार्ड रचनेवर पँथर्स रिपब्लिकन पक्षाने आक्षेप नोंदवला आहे. वार्ड क्रमांक ५ मध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले असून ते रद्द करून सदर वार्ड अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी राखीव ठेवावा, अशी मागणी पक्षाचे तालुका अध्यक्ष राजअनंत सुरतकर यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, गल्ले बोरगाव ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक ५ मध्ये भिल्ल समाजाचे सुमारे ११० मतदार आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणुकीत एसटी समाजाला प्रतिनिधित्वाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे सन २०२५-२६ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत एसटी समाजाला न्याय मिळावा व त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रतिनिधित्वाची संधी मिळावी यासाठी सदर वार्ड एसटी प्रवर्गासाठी राखीव करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच सध्या जाहीर करण्यात आलेली वार्ड रचना पक्षाला मान्य नसून या संदर्भात अधिकृत आक्षेप अर्ज सादर करण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या वार्ड रचनेत आवश्यक बदल करून एसटी समाजातील महिला अथवा पुरुष उमेदवारासाठी आरक्षण निश्चित करावे, अशी विनंती प्रशासनाकडे करण्यात आली आहे.या निवेदनावर पँथर्स रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष राजअनंत सुरतकर यांची स्वाक्षरी असून प्रशासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

BHARAT 24 TAAS

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर