मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
⛽ पेट्रोल मुंबई: ₹104.21/L | पुणे: ₹103.85/L
🪙 सोने (24K) ₹72,450 / 10gm
🥈 चांदी ₹84,200 / 1kg
📅 पंचांग आजची तिथी: श्रावण शु. पक्ष
ब्रेकिंग

महानगर गॅसच्या नावाखाली जोगेश्वरीत सायबर दरोड्याचा प्रयत्न, शिवटेकडी परिसरातील महिला थोडक्यात बचावली; सावध राहण्याचे आवाहन...

अक्षर आकार:
वृत्तांकन: संदिप कसालकर
जोगेश्वरी पूर्व येथील शिवटेकडी परिसरात राहणाऱ्या एका स्थानिक महिलेला महानगर गॅसच्या नावाखाली व्हॉट्सॲपवर एक बनावट मेसेज आला आहे. सायबर गुन्हेगार गॅस बिल अपडेट करण्याच्या बहाण्याने ग्राहकांना Gas Bill Update.apk नावाची घातक फाईल पाठवून बँक खात्यांवर डल्ला मारत आहेत.
काय करू नका?
 * अनोळखी नंबरवरून आलेल्या कोणत्याही .apk फाईलवर क्लिक किंवा ती डाऊनलोड करू नका.
 * गॅस कनेक्शन कापले जाईल या भीतीने सायबर चोरांच्या सांगण्यावरून कोणतीही कृती करू नका.

काय करावे?
 * गॅस बिलाची पडताळणी केवळ महानगर गॅसच्या अधिकृत ॲप किंवा वेबसाईटवरूनच करा.
 * असा कोणताही संशयास्पद मेसेज आल्यास संबंधित नंबरला त्वरित ब्लॉक आणि रिपोर्ट करा.
घाईगडबडीत घेतलेला एक चुकीचा निर्णय तुमचे बँक खाते पूर्णपणे रिकामे करू शकतो. जागरूक राहा आणि आपल्या परिसरातील नागरिकांना सतर्क करा.

Bharat 24 Taas

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)