मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
⛽ पेट्रोल मुंबई: ₹104.21/L | पुणे: ₹103.85/L
🪙 सोने (24K) ₹72,450 / 10gm
🥈 चांदी ₹84,200 / 1kg
📅 पंचांग आजची तिथी: श्रावण शु. पक्ष
ब्रेकिंग

जोगेश्वरीची 'रणरागिणी' आता उपनेतेपदी! उद्धव ठाकरेंनी शिवानी परब यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

अक्षर आकार:

वृत्तांकन: संदिप कसालकर

मुंबई: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. प्रभाग क्रमांक ७७ च्या डॅशिंग नगरसेविका शिवानी परब यांची पक्षाच्या 'उपनेते' पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली असून, यामुळे जोगेश्वरी परिसरात शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

शिवानी परब यांनी आपल्या प्रभागात केलेली विकासकामं आणि पक्ष संघटनेसाठी दिलेला वेळ, यामुळे त्या नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. कठीण काळातही पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यांनी आपली ताकद दाखवून दिली होती. त्यांच्या याच आक्रमक कार्यशैलीमुळे आणि जनसंपर्कामुळे त्यांना आता राज्य पातळीवर मोठी संधी देण्यात आली आहे.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून या नियुक्तीचे अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे. या नियुक्तीनंतर शिवानी परब यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महिला आघाडीत त्यांचे वर्चस्व आधीच होते, आता उपनेते पद मिळाल्याने पक्षाचा विस्तार करण्यासाठी त्यांच्याकडे मोठी जबाबदारी असणार आहे.

Bharat 24 Taas

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)