मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
⛽ पेट्रोल मुंबई: ₹104.21/L | पुणे: ₹103.85/L
🪙 सोने (24K) ₹72,450 / 10gm
🥈 चांदी ₹84,200 / 1kg
📅 पंचांग आजची तिथी: श्रावण शु. पक्ष
ब्रेकिंग

बिबट्याची दहशत अन् ड्रग्जचा विळखा; खासदार रवींद्र वायकर 'ॲक्शन मोड'मध्ये, पेडलर्सना थेट सीमेबाहेर धाडणार!

अक्षर आकार:


वृत्तांकन: संदिप कसालकर

मुंबई: उत्तर-पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर सध्या ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. एकीकडे दिंडोशीच्या वस्त्यांमध्ये बिबट्याची दहशत आणि दुसरीकडे तरुण पिढीला पोखरू पाहणारे ड्रग्जचे रॅकेट; या दोन्ही संकटांविरोधात वायकरांनी आता 'आरपारची' लढाई पुकारली आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिंडोशी आणि गोरेगावच्या उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये बिबट्याचा उच्छाद वाढला आहे. "नुसत्या इमारतींना जाळ्या लावून चालणार नाही, तर बिबट्या ज्या जंगलातून बाहेर येतोय, तो एन्ट्री पॉईंटच कायमचा बंद करावा लागेल," असा कडक पवित्रा वायकरांनी घेतला आहे. आरे कॉलनीप्रमाणेच येथेही संरक्षक भिंत उभारण्याबाबत उद्याच सचिवांशी तातडीची बैठक होणार आहे.

                            

नागरी निवारा परिसरात झालेल्या राड्याने संपूर्ण मुंबई हादरली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे थेट ड्रग्ज रॅकेटशी जोडले गेले आहेत. यावर बोलताना खासदार वायकर गरजले, "गोरेगाव, जोगेश्वरी आणि पवई भागात ड्रग्जचा कॅन्सर पसरलाय. यामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांचा मोठा हात आहे. आता SIR (Special Intense Revision) अंतर्गत शोधमोहीम सुरू झाली असून, या 'उपऱ्यां'ना पकडून थेट सीमेबाहेर हाकलणार!"

"जनतेने घाबरू नका, पण कायदा हातात घेऊ नका. जे समाजविघातक कृत्ये करत आहेत, त्यांना कायद्यानेच चपराक देणार!" - रवींद्र वायकर, खासदार

Bharat 24 Taas

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)