Hot Posts

6/recent/ticker-posts

१ कोटींचा विमा, झिरो बॅलन्स खातं!" – सीआयएसएफसाठी SBI चा ऐतिहासिक करार

एसबीआयसोबतचा नवा करार, १ कोटींचा अपघाती विमा आणि अनेक फायदे – तेही मोफत!

नवी दिल्ली | २४ मे २०२५: देशाच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या सीआयएसएफ (CISF) जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिकदृष्ट्या सशक्त करणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय स्टेट बँक (SBI) आणि CISF यांच्यात २३ मे रोजी ३ वर्षांचा महत्त्वाचा सामंजस्य करार (MoU) झाला आहे, जो 23.05.2025 ते 22.05.2028 पर्यंत लागू राहील.

सेवारत जवानांसाठी विशेष फायदे –

  • १ कोटी रुपयांचा अपघाती मृत्यू विमा
  • हवाई अपघातासाठी १.५ कोटींचा विमा
  • १० लाखांचा टर्म इन्शुरन्स – प्रथमच उपलब्ध
  • पूर्ण/अर्धांग विकलांगतेसाठी १ कोटी रुपयांपर्यंतचे संरक्षण

निवृत्त जवानांसाठीही दिलासादायक लाभ –

  • ५० लाख रुपयांचा अपघाती विमा (मृत्यू)
  • झिरो बॅलन्स खाते
  • फ्री डेबिट कार्ड, वार्षिक शुल्क नाही
  • SBI ATM वर असीमित मोफत व्यवहार, इतर ATM वर दरमहा १० मोफत व्यवहार
  • मोफत डिमांड ड्राफ्ट, ऑटो स्वीप सुविधा
  • लॉकर भाड्यावर १०% सूट

अपघाताने मृत्यू झाल्यास मिळणारे खास लाभ –

  • प्लास्टिक सर्जरी (जळाल्यास)
  • मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत
  • मुलीच्या लग्नासाठी साहाय्य
  • एअर अ‍ॅम्ब्युलन्स: १० लाखांपर्यंत खर्च भागवला जाईल
  • एम्ब्युलन्स खर्च: ५०,००० रुपयांपर्यंत परतावा

‘SBI रिश्ते’ – कुटुंबासाठी विशेष योजना –

  • सीआयएसएफ जवानांचे पती/पत्नी, मुले, पालक व भावंडांसाठीझिरो बॅलन्स खाती
  • प्रत्येक खातेदाराला ५ लाख रुपयांचा अपघाती मृत्यू विमा (नाबालक वगळता)
  • फ्री डेबिट कार्ड, डिमांड ड्राफ्ट मोफत
  • ATM व्यवहारांवर सूट, लॉकरवर १०% सूट

तक्रार निवारण व सुविधा व्यवस्थापन –

  • SBI चा विशेष रिलेशनशिप मॅनेजर सीआयएसएफ मुख्यालयात कार्यरत राहणार
  • तक्रार निवारण सेल स्थापन केला जाणार, जेणेकरून लाभ वेळेवर मिळतील

SBI लवकरच सीआयएसएफ कॅम्पसमध्ये शाखा सुरू करणार आणि जवानांसाठी बँकिंग-जागरूकता कार्यक्रम घेणार.


हे केवळ आर्थिक पॅकेज नाही, तर जवान आणि त्यांच्या कुटुंबांच्या सुरक्षिततेची आणि सन्मानाची खात्री आहे!

Post a Comment

0 Comments