भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

‘गोल्डन’ पंच! श्रीलंकेत आरजेएमडीएसच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय चमक!

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
जॉईन व्हा
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!

वृत्तांकन: संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, भारत २४ तास)

आरजेएमडीएस इंग्लिश स्कुल, जोगेश्वरीच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी!

जोगेश्वरी | रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई संचालित आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल, जोगेश्वरी येथील विद्यार्थ्यांनी श्रीलंका (कोलंबो) येथे नुकत्याच पार पडलेल्या ९व्या एशिया गोजु रयु कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे नाव उज्वल करत जागतिक स्तरावर यश संपादन केले आहे.

टीम कुमिटे स्पर्धेत
अक्षर पालव आणि अर्णव शेळके यांनी सुवर्ण पदक (Gold Medal) पटकावले.

टीम काटा स्पर्धेत
अक्षर पालव व अर्णव शेळके यांनी रौप्य पदक (Silver Medal) मिळवले.

टीम काटा - तृतीय क्रमांक
अक्षर पालव, अर्णव शेळके आणि मोक्षदा शेळके या त्रिकुटाला ब्रॉंझ पदक (Bronze Medal) मिळाले.

या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षक भीमराव पवार व धीरज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंकेत जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर ही कामगिरी केली.

या यशाबद्दल रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज संस्थेचे कार्याध्यक्ष सहदेव सावंत, उपाध्यक्ष अशोक परब, सरचिटणीस जितेंद्र पवार, शाळेचे सीईओ दीपक खानविलकर, कार्यकारिणी सदस्या इंद्रायणी सावंत, मुख्याध्यापिका डिंपल दुसाने आणि शबनम मॅडम यांनी विद्यार्थी व प्रशिक्षकांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जोगेश्वरीतील विविध संस्था, स्थानिक नागरिक, पालकवर्ग आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या प्रशिक्षकांचे सर्वस्तरातून कौतुक केले आहे.


विद्यार्थ्यांच्या या कर्तृत्वामुळे जोगेश्वरीच्या शैक्षणिक क्षेत्रात एक नवा विश्वास निर्माण झाला आहे!

Bharat 24 Taas

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर