मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
⛽ पेट्रोल मुंबई: ₹104.21/L | पुणे: ₹103.85/L
🪙 सोने (24K) ₹72,450 / 10gm
🥈 चांदी ₹84,200 / 1kg
📅 पंचांग आजची तिथी: श्रावण शु. पक्ष
ब्रेकिंग

मुंबईत अवतरलं ‘लाइव्ह कोकण’! जोगेश्वरीत सुरु झाला धमाकेदार कोकण महोत्सव

अक्षर आकार:

संदिप कसालकर (संपादक, भारत २४ तास)

मुंबई | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पुरस्कृत युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने २० मे ते १० जून २०२५ दरम्यान ‘कोकण महोत्सव आणि जोगेश्वरी-अंधेरी कार्निवल’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या महोत्सवात कोकणची चव, कलापरंपरा, लोकसंगीत, आणि सांस्कृतिक ठेवा मुंबईच्या हृदयात सादर होणार आहे.

हा उत्सव अंधेरी पूर्व येथील रॉयल मैदानावर सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत पार पडणार असून, सर्व मुंबईकरांसाठी खुला आणि आकर्षणाने परिपूर्ण आहे. महोत्सवात कोकणातील खास खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, लोककलेचे कार्यक्रम, लहान मुलांसाठी कार्निवल स्टॉल्स आणि मनोरंजनाचे विविध पर्याय पाहायला मिळणार आहेत.

कार्यक्रमात दररोज नवीन सांस्कृतिक सादरीकरण, शालेय विद्यार्थ्यांचे नृत्य व गीत स्पर्धा, महिला मंडळांचे सादरीकरण, तसेच स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देण्यात येणार आहे. २१ दिवस चालणाऱ्या या कार्निवलमध्ये प्रेक्षकांना कोकणची खरी अनुभूती देणारे प्रत्येक क्षण खास असणार आहेत.

या महोत्सवाचे प्रमुख आयोजक आहेत अमोल भिंगार्डे तसेच सुयश साटम (युवा नेता, जोगेश्वरी विधानसभा चिटणीस ) यांनी देखील मोलाचा सहभाग नोंदविला आहे. या कार्यक्रमात शिवसेनेचे विविध नेते, पदाधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर देखील सहभागी होणार आहेत. विशेषतः अनिल परब, आमदार बाळा नर, सुनील प्रभू यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमुळे महोत्सवाची शान वाढणार आहे.

महोत्सवाच्या निमित्ताने मुंबईकरांना केवळ करमणूकच नव्हे, तर आपल्या कोकणच्या संस्कृतीशी नाळ जुळवण्याची संधी मिळणार आहे. परंपरा, कला, खाद्यसंस्कृती आणि स्थानिक लोकजीवन यांचे सुरेख मिश्रण या कार्यक्रमात अनुभवायला मिळणार आहे.


Bharat 24 Taas

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)