मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
⛽ पेट्रोल मुंबई: ₹104.21/L | पुणे: ₹103.85/L
🪙 सोने (24K) ₹72,450 / 10gm
🥈 चांदी ₹84,200 / 1kg
📅 पंचांग आजची तिथी: श्रावण शु. पक्ष
ब्रेकिंग

मराठी फलक नसेल, तर कारवाई अटळ! डोंबिवलीत मनसेची सक्त मोहीम सुरू

अक्षर आकार:

विशेष प्रतिनिधी

डोंबिवली पूर्वमधील बाजारपेठ, दुकाने, कार्यालये आणि शाळांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार मराठी भाषेतील फलक लावणे बंधनकारक आहे. मात्र अनेक आस्थापनांमध्ये अद्यापही मराठी फलक लावलेले नसल्याचे निदर्शनास आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याविरोधात सक्रीय पाऊल उचलले आहे.

मनसेचे डोंबिवली शहर संघटक हरिष वसंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली, अनिल दाभाडे (उपविभाग अध्यक्ष), सुनील कोकरे (शाखा अध्यक्ष), रोहित गायकवाड आणि इतर महाराष्ट्र सैनिकांनी बाजारपेठेतील व्यावसायिकांना भेट देत, मराठी फलक न लावणाऱ्यांना विनंती वजा सूचना पत्रके दिली.




या मोहिमेद्वारे मनसेने स्पष्ट केले आहे की, जर आस्थापनांनी मराठी फलक त्वरित लावले नाहीत, तर पुढील पावले अधिक तीव्र असतील. डोंबिवली शहरात सुरू झालेली ही मोहीम आता इतर भागांमध्येही पोहोचण्याची शक्यता आहे.

मराठी भाषेचा सन्मान राखण्यासाठी मनसेने पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे – "मराठी पाट्या नसतील, तर आंदोलन अटळ!"

Bharat 24 Taas

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)