मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
⛽ पेट्रोल मुंबई: ₹104.21/L | पुणे: ₹103.85/L
🪙 सोने (24K) ₹72,450 / 10gm
🥈 चांदी ₹84,200 / 1kg
📅 पंचांग आजची तिथी: श्रावण शु. पक्ष
ब्रेकिंग

"ऑपरेशन सिंदूर" नंतर जोगेश्वरीत उसळली देशभक्तीची लाट! तिरंगा यात्रेने जागवला अभिमानाचा क्षण!

अक्षर आकार:


 Watch the Video here...

संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, भारत २४ तास)

जोगेश्वरी | 25 मे 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या "ऑपरेशन सिंदूर" या ऐतिहासिक मोहिमेनंतर संपूर्ण देशात देशभक्तीचा सूर निनादू लागला आहे. या यशस्वी मोहिमेचा साजरा करण्यासाठी जोगेश्वरी परिसरात काल म्हणजेच २५ मे रोजी भव्य "तिरंगा यात्रा" काढण्यात आली.

भारतीय लष्कराच्या तीनही शाखांनी – थलसेना, नौसेना आणि हवाई दलाने – अफाट धैर्य आणि अचूक नियोजनाच्या जोरावर शत्रूच्या हद्दीत जाऊन भारतीय नागरिकांना सुरक्षित परत आणले. देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाणारी ही कारवाई म्हणजे 'ऑपरेशन सिंदूर'!

याच शौर्याची आठवण आणि भारतीय लष्कराला मानवंदना म्हणून जोगेश्वरीत तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेत जिल्हाध्यक्ष संतोष मढेकर, माजी सैनिक सुभेदार सुभाष दरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


तिरंगा यात्रेचे नियोजन वॉर्ड 77 चे अध्यक्ष प्रवीण सारंग, वॉर्ड 73 चे सिद्धेश वाडेकर, वॉर्ड 74 चे विजय वाळवे तसेच विनोद कदम यांनी मिळून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केले.

यात्रेदरम्यान शेकडो तरुणांनी बाईक रॅली काढली, हातात तिरंगा, डोक्यावर शौर्य आणि मुखात "भारत माता की जय", "वंदे मातरम" अशा घोषणा देत परिसर देशप्रेमाने भारून गेला. जिथून रॅली जात होती तिथे नागरिक टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत करत होते. वृद्ध, महिलांनी देखील या यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद दिला.


तिरंगा यात्रेद्वारे देशाच्या वीर जवानांना सलाम करण्यात आला. काही ठिकाणी तर मुलांनी सैनिकांचे पोशाख परिधान करून "जय हिंद" चे नारे दिले, ज्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले.

"ऑपरेशन सिंदूर" म्हणजे केवळ एक कारवाई नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे. भारताने पुन्हा एकदा सिद्ध केले की, संकटाच्या काळात आपले सैनिक मागे हटत नाहीत – ते इतिहास घडवतात!


आजच्या या तिरंगा यात्रेने जोगेश्वरीकरांनी आपल्या हृदयात दडलेल्या देशप्रेमाला उजाळा दिला. हा फक्त उत्सव नव्हता, ही होती राष्ट्राभिमानाची जागृती!

Bharat 24 Taas

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)